शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

यंदा दणक्यात पाऊस! तब्बल १०१ टक्के बरसणार; भारतीय हवामान विभागाचा सुधारित अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 06:58 IST

आयएमडीने यावेळी पहिल्यांदाच देशातील ३६ हवामान विभागांतल्या पावसाचा अंदाज सांगितला आहे. त्यानुसार कोकणात यंदा सरासरीच्या तुलनेत अधिक पावसाची शक्यता आहे. मराठवाडा व दक्षिण मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

पुणे : यंदा दणक्यात पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) वर्तविला आहे. पावसाचा (मान्सून) दुसरा सुधारित अंदाज मंगळवारी आयएमडीने जाहीर केला. जून ते सप्टेंबर या कालावधीत देशभरात १०१ टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आयएमडीने यावेळी पहिल्यांदाच देशातील ३६ हवामान विभागांतल्या पावसाचा अंदाज सांगितला आहे. त्यानुसार कोकणात यंदा सरासरीच्या तुलनेत अधिक पावसाची शक्यता आहे. मराठवाडा व दक्षिण मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. प्रशांत महासागरात ‘ला निनो’ स्थिती तयार झाल्याचा फायदा मान्सूनला होणार आहे. त्यामुळे उत्तरार्धात चांगल्या पावसाची शक्यता आहे. भारताच्या दृष्टीने शेतीचे क्षेत्र व त्या ठिकाणी पडणारा पाऊस अतिशय महत्त्वाचा ठरतो. त्यादृष्टीने हवामान विभागाने यंदा प्रामुख्याने शेतीक्षेत्राचा समावेश असलेल्या कोअर झोन निश्चित केला आहे. त्या ठिकाणी १०६% पाऊस पडण्याचा अंदाज आहे.कोकण, पूर्व विदर्भात जूनमध्ये अधिक पाऊसहवामान विभागाने यंदा प्रथमच हवामान विभागानुसार अंदाज व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानुसार कोकण आणि पूर्व विदर्भात जूनमध्ये सरासरीच्या तुुलनेत अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात जूनमध्ये पावसाचे प्रमाण कमी असेल. आगमन उशिरा?सध्या केरळमध्ये मान्सूनपूर्व पाऊस पडतो आहे. अंदमानात पोहोचलेला मान्सून केरळात पोहोचल्याचे जाहीर करण्यासाठी आवश्यक पाऊसमान, वाऱ्यांची दिशा हे निकष अजून पूर्ण झालेेले नाहीत. यंदा मान्सून केरळात थोडा उशिरा म्हणजे ३ जूनपर्यंत येण्याची शक्यता आहे. पुढील वाटचालीस उशीर होऊ शकतो.दुष्काळाची शक्यता अगदी कमी‘मॉन्सून मॉडेल’नुसार यंदा दुष्काळ म्हणजेच सरासरीच्या ९० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता फक्त ८ टक्केच आहे. सरासरीच्या ९० ते ९६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता  १८ टक्के आहे. तर, सरासरीच्या ९६ ते १०४ अशा सर्वसाधारण पावसाची शक्यता ४०% आहे.  सरासरीपेक्षा जास्त १०४ ते ११० टक्के पावसाची शक्यता २२ टक्के आहे, तर खूप जास्त म्हणजे सरासरीच्या ११० टक्के पावसाची शक्यता १२ टक्के आहे.

टॅग्स :Rainपाऊस