शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

‘इंडिया’चा हायकोर्टाच्या न्यायाधीशांविरोधात महाभियोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 05:56 IST

अलाहाबाद हायकाेर्टाचे न्यायाधीश यादव यांना वादग्रस्त वक्तव्य भाेवणार

नवी दिल्ली : इलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश शेखर यादव यांच्याविरोधात महाभियोग आणण्याची तयारी  विरोधी पक्षाच्या  इंडिया आघाडीने सुरू केली आहे. हा प्रस्ताव आणण्यासाठी नोटीस देण्यासाठी विरोधकांनी मोहीम सुरू केली असून त्यावर खासदारांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जात आहेत. 

महाभियोग प्रस्तावाच्या नोटिशीवर आतापर्यंत ३८ सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. बुधवारी संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचे कामकाज तहकूब झाले. त्यामुळे विरोधी पक्षांच्या सर्व सदस्यांच्या स्वाक्षऱ्या होऊ शकल्या नाहीत. 

गुरुवारपर्यंत या प्रस्तावावर किमान ५० खासदार स्वाक्षऱ्या करणार असून त्यानंतर नोटीस पुढे पाठवली जाणार असल्याचे काँग्रेस खासदार विवेक तन्खा यांनी सांगितले. चालू हिवाळी अधिवेशनात न्या. यादव यांच्याविरोधातील महाभियोगाची नोटीस दिली जाणार आहे. या प्रस्तावाशी संबंधित नोटीस १०० लोकसभा खासदार किंवा ५० राज्यसभा सदस्यांनी सादर करणे आवश्यक आहे. विश्व हिंदू परिषदेच्या एका कार्यक्रमाला संबोधित करताना न्या. यादव यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले. त्यानंतर राज्यसभा सदस्य व ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी मंगळवारी महाभियोग प्रस्तावासंदर्भात नोटीस दिली जाणार असल्याचे स्पष्ट केले होते.

महाभियोगाला कॅथोलिक संस्थेचा पाठिंबा न्या. शेखर यादव यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यासंदर्भात महाभियोगाचा प्रस्ताव आणण्यासंदर्भात विरोधकांनी घेतलेल्या निर्णयाला कॅथलिक बिशप कॉन्फरन्स ऑफ इंडिया अर्थात सीबीसीआयने पाठिंबा दिला आहे. देश बहुसंख्यांच्या इच्छेनुसार चालेल असे वादग्रस्त वक्तव्य न्या. यादव यांनी केले आहे. बुधवारी एक  निवेदन जारी करत सीबीसीआयने न्या. यादव यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयcongressकाँग्रेस