शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘इंडिया’ची शेतकऱ्यांना एमएसपीची गॅरंटी; राहुल गांधी यांनी केली मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 10:27 IST

निदर्शक शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्याच्या अनुषंगाने राहुल यांनी सरकारवर टीका केली.

अंबिकापूर : आगामी लोकसभा निवडणुकांत इंडिया आघाडी केंद्रात सत्तेवर आल्यास किमान आधारभूत किमतीला (एमएसपी) कायदेशीर हमी देण्यात येईल, अशी घोषणा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली आहे. देशातील हरित क्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या समितीने केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याचा मुद्दा इंडिया आघाडीच्या निवडणूक जाहीरनाम्यात समाविष्ट करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

भारत जोडो यात्रेदरम्यान  अंबिकापूर येथे जाहीर सभेत राहुल गांधी यांनी सांगितले की, सध्या निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांना पांगविण्यासाठी सरकार अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत आहे. विविध मागण्या करणारे निदर्शक तसेच दिल्ली चलो आंदोलन करणाऱ्यांना तुरुंगात डांबण्यात आले आहे. विद्यमान केंद्र सरकारने जीएसटी व नोटाबंदी यांचा वापर देशातील व्यापाऱ्यांना उद्ध्वस्त होण्यासाठी केला आहे. निदर्शक शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्याच्या अनुषंगाने राहुल यांनी सरकारवर टीका केली.

योग्य भाव मिळावा...‘दिल्ली चलो’ आंदोलनाचे नेतृत्व करणारा संयुक्त किसान मोर्चा (गैरराजकीय) आणि किसान मजदूर मोर्चा या संघटनेने केलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये पिकांसाठी किमान आधारभूत किंमत आणि कर्जमाफीचा कायदा या प्रमुख मागण्या आहेत. राहुल गांधी यांनी सांगितले की, कृषिमालाला योग्य भाव मिळावा यासाठी हे शेतकरी आंदोलन करत आहेत. डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना विद्यमान केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार दिला; पण स्वामीनाथन समितीने केलेल्या शिफारसी लागू करण्यास हे सरकार तयार नाही. 

शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी इंडिया आघाडी सक्रियकाँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सांगितले की, किमान आधारभूत किंमत मिळण्याचा कायदेशीर हक्क शेतकऱ्यांना प्राप्त झाला पाहिजे, असे डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या समितीने आपल्या अहवालात म्हटले आहे. इंडिया आघाडी केंद्रात सत्तेवर आल्यास डॉ. स्वामीनाथन समितीच्या सर्व शिफारसींची अंमलबजावणी केली जाईल. इंडिया आघाडी नेहमी शेतकरी व सामान्य माणसांच्या कल्याणासाठीच काम करत राहाणार आहे. 

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस