शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

"आमच्याकडे देशातील वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या जातीचे...", सचिननं सांगितली भारताची 'ताकद'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 14:01 IST

भारतीयांच्या लाडक्या सचिनला निवडणूक आयोगाचा 'नॅशनल आयकॉन' म्हणून देखील ओळखलं जाणार आहे.

नवी दिल्ली : भारताचा महान क्रिकेटपटू क्रिकेटचा देव, मास्टरब्लास्टर, जागतिक क्रिकेटला नवीन ओळख देणारा आणि भारतीयांचे दैवत अशा अनेक नावांनी ओळखल्या जाणाऱ्या सचिनची जगभर ख्याती आहे. आता भारतीयांच्या लाडक्या सचिनला निवडणूक आयोगाचा 'नॅशनल आयकॉन' म्हणून देखील ओळखलं जाणार आहे. सचिन तेंडुलकरलानिवडणूक आयोगाचा नॅशनल आयकॉन बनवण्यात आलं आहे. अधिकाधिक लोकांना मतदानासाठी प्रवृत्त करणं ही सचिनची जबाबदारी असेल. राष्ट्रीय निवडणूक आयोगाचे प्रमुख राजीव कुमार यांच्या उपस्थितीत दिल्लीत सचिनला ही नवी जबाबदारी देण्यात आली. तेंडुलकर आणि निवडणूक आयोग यांच्यात दिल्लीत सामंजस्य करार झाला. तीन वर्षांच्या करारांतर्गत तेंडुलकर मतदारांमध्ये जनजागृती करण्याचं काम करेल. यावेळी बोलताना क्रिकेटच्या देवानं भारताची ताकद सांगताना ड्रेसिंग रूममधील आठवणींना उजाळा दिला.  आमच्याकडे देशाच्या वेगवेगळ्या भागातून, वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या संस्कृतीचे खेळाडू होते आणि ते सगळे ड्रेसिंग रूममध्ये होते. पण, तीच आमची ताकद होती, असे सचिननं सांगितलं. तसेच एक भारतीय म्हणून मी लोकांना सांगू इच्छितो की भारत हे जगातील सर्वाधिक युवा असलेलं राष्ट्र आहे. याशिवाय मतदानाच्या बाबतीत भारत जगातील सर्वात जबाबदार राष्ट्र देखील आहे, असंही सचिननं नमूद केलं. 

आगामी लोकसभा निवडूक २०२४ च्या तयारीसाठी निवडणूक आयोग कामाला लागलं आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगानं एका निवेदनात म्हटलं, "आगामी निवडणुकांमध्ये खासकरून २०२४च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी युवकांमधील तेंडुलकरच्या प्रभावाचा फायदा घेण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचं पाऊल असेल." दरम्यान, मागील वर्षी निवडणूक आयोगानं अभिनेता पंकज त्रिपाठीला राष्ट्रीय आयकॉन म्हणून मान्यता दिली होती. आता यावेळी क्रिकेटचा महान भारतरत्न पुरस्कार विजेता सचिन तेंडुलकरची नॅशनल आयकॉन म्हणून निवड करण्यात आली आहे. 

टॅग्स :Sachin Tendulkarसचिन तेंडुलकरlok sabhaलोकसभाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगElectionनिवडणूकTeam Indiaभारतीय क्रिकेट संघ