शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भारतातील पहिली महिला हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टर पद्मावतींचे निधन, कोरोनानं होत्या संक्रमित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 10:16 IST

डॉ. पद्मावती यांना दोन्ही फुफ्फुसात गंभीर संक्रमण झाले, ज्यामुळे त्यांचं निधन झालं. डॉ. पद्मावती यांच्या पश्‍चिम दिल्लीतील पंजाबी बाग स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

भारतातील पहिली महिला हृदयरोगतज्ज्ञ(कार्डियोलॉजिस्ट) डॉक्टर एसआय पद्मावती यांचं वयाच्या 103व्या वर्षी शनिवारी निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. 11 दिवसांपूर्वीच त्यांना नॅशनल हार्ट इन्स्टिट्यूट(एनएचआय)मध्ये दाखल करण्यात आले होते. रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ओ. पी. यादव यांनी सांगितले की, डॉ. पद्मावती यांना दोन्ही फुफ्फुसात गंभीर संक्रमण झाले, ज्यामुळे त्यांचं निधन झालं. डॉ. पद्मावती यांच्या पश्‍चिम दिल्लीतील पंजाबी बाग स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.महान हृदयरोगतज्ज्ञ असलेल्या या डॉक्टर शेवटच्या दिवसापर्यंत एक सक्रिय आणि निरोगी जीवन जगल्या. 2015च्या अखेरीस त्या आठवड्यातून पाच दिवस, दिवसा 12 तास एनएचआयमध्ये काम करत होत्या. त्यांनी 1981मध्ये एनएचआयची स्थापना केली. त्यांच्या योगदानामुळेच त्यांना 'कार्डिओलॉजीची गॉडमदर' ही पदवी देण्यात आली.1954मध्ये त्यांनी लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेजमध्ये उत्तर भारतातील प्रथम हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी प्रयोगशाळा स्थापन केली. 1967मध्ये त्यांनी मौलाना आझाद मेडिकल कॉलेजचे संचालक-प्राचार्य म्हणून पदभार स्वीकारला, इर्विन व जी. बी. पंत रुग्णालयातही रुजू झाले. येथूनच त्यांनी कार्डिओलॉजीचा पहिला डीएम कोर्स, पहिलं कोरोनरी केयर युनिट आणि भारतातील पहिली कोरोनरी केअर व्हॅन सुरू केली. डॉ. एस. पद्मावती यांनी 1962मध्ये ऑल इंडिया हार्ट फाऊंडेशन आणि 1981मध्ये नॅशनल हार्ट इन्स्टिट्यूटची स्थापना केली. भारत सरकारने 1967मध्ये त्यांना पद्मभूषण आणि 1992मध्ये पद्मविभूषणाने सन्मानित केले होते.