भारतीयांना आवडते देसी 'पॉर्न', दिल्ली आघाडीवर

By Admin | Updated: April 7, 2016 11:09 IST2016-04-07T10:31:58+5:302016-04-07T11:09:09+5:30

भारतात पॉर्न पाहणा-यांची संख्या मोठी असून, आता मोबाईलमध्ये इंटरनेट सहज उपलब्ध झाल्यामुळे ही संख्या वेगाने वाढत आहे.

India's favorite country 'Porn', Delhi leads the front | भारतीयांना आवडते देसी 'पॉर्न', दिल्ली आघाडीवर

भारतीयांना आवडते देसी 'पॉर्न', दिल्ली आघाडीवर

ऑनलाइन लोकमत 

हैदराबाद, दि.  ७ - भारतात पॉर्न पाहणा-यांची संख्या मोठी असून, आता मोबाईलमध्ये इंटरनेट सहज उपलब्ध झाल्यामुळे ही संख्या वेगाने वाढत आहे. भारतीयांना पॉर्न पहायला आवडते आणि देसी पॉर्न त्यांना जास्त आवडते. 
 
टाईम्स ऑफ इंडियाने एका आघाडीच्या पॉर्न वेबसाईटला काही प्रश्न विचारले त्यातून ही माहिती समोर आली आहे. देशातील पाच शहरातील पॉर्न पाहण्याचा कल बघितला तर, दिल्ली ३९.२ टक्के ट्रॅफीकसह आघाडीवर आहे. 
 
कोलकाता, चेन्नई, मुंबई आणि हैदराबाद या शहरातील पॉर्न पाहणा-यांची संख्या ब-यापैकी आहे. भारतात पॉर्न पाहण्यासाठी इंडियन कॉलेज गर्ल्स, इंडियन भाभी, बंगाली आणि इंडियन आंटी या शब्दांनी सर्वाधिक सर्च केले जाते. 
 
मागच्यावर्षी ऑगस्ट महिन्यात दूरसंचार खात्याने अश्लील आशय असलेल्या ८५७ संकेतस्थळांवर बंदी घातली होती. मात्र नंतर दूरसंचार खात्याने हा निर्णय बदलून फक्त चाईल्ड पॉर्नोग्राफी साईटसवर बंदी कायम ठेवली. 
 
चेन्नई शेवटून दुस-या स्थानावर आहे. चेन्नईमधून पॉर्न ट्रॅफीक फक्त सहा टक्के आहे. इथे तामिळ या कॅटगरीमध्ये सर्वाधिक सर्च केले जाते. चेन्नईमध्ये मात्र पॉर्न पाहण्याची वेळ कमी आहे. सरासरी सात मिनिट ५२ सेकंद पॉर्न पाहिले जाते. राष्ट्रीय सरासरी आठ मिनिट ५८ सेकंद आहे. पॉर्न ट्रॅफीकमध्ये मुंबई चौथ्या स्थानावर आहे. 
 
मुंबईत ४६ टक्के एमआयएलएफ कॅटेगरीमध्ये जास्त वयाच्या महिलांचे पॉर्न व्हिडीओ सर्च केले जातात. कोलकाता पाचव्या स्थानावर असन, इथे जापनीस पॉर्न व्हिडीओ सर्वाधिक पाहिले जातात. भारतात सेलिब्रिटी सर्चमध्ये सनी लिऑन आघाडीवर आहे.  
 

Web Title: India's favorite country 'Porn', Delhi leads the front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.