शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

भारताचा चीनवर ‘इलेक्ट्रॉनिक स्ट्राइक’; विदेशी लॅपटाॅप, काॅम्प्युटर महागणार; ...म्हणून उचललं पाऊल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 13:40 IST

...तसेच चीनसारख्या देशांतून होणारी आयात कमी करणे, हाही एक उद्देश त्यामागे आहे. 

नवी दिल्ली : केंद्र सरकारने लॅपटॉप, टॅबलेट, ऑल-इन-वन वैयक्तिक संगणक, अल्ट्रा स्मॉल फॉर्म फॅक्टर (यूएसएफएफ) संगणक आणि सर्व्हर यांच्या आयातीवर बंधने (रिस्ट्रिक्शन्स) घातली आहेत. हा निर्णय तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आला असून, या उत्पादनांच्या आयातीसाठी आता परवाना किंवा सरकारच्या मंजुरीची गरज लागेल. देशांतर्गत उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. तसेच चीनसारख्या देशांतून होणारी आयात कमी करणे, हाही एक उद्देश त्यामागे आहे. 

विदेश व्यापार महासंचालनालयाने गुरुवारी अधिसूचना जारी केली. त्यात म्हटले की, संशोधन व विकास, परीक्षण, बेंचमार्किंग, मूल्यांकन, देखभाल व उत्पादन विकास या उद्देशाने प्रति खेप २० वस्तूंच्या आयातीला परवान्याची गरज नसेल. 

कोणाच्या किमती वाढणार? - ॲपलसह विविध कंपन्यांच्या लॅपटॉपची आयातही बंद होणार आहे. - देशात विकले जाणारे बहुतांश लॅपटॉप हे चीन, कोरियामध्ये तयार होतात. डेल, एचपी, एसर, लिनोव्हो आदी कंपन्यांचे भारतात प्रकल्प असल्याने त्यांच्या निर्मितीला देशात प्रोत्साहन मिळेल. - ॲपलचा भारतात प्रकल्प नसल्याने या कंपनीच्या उत्पादनांचा देशात तुटवडा जाणवू शकतो. ते महाग होऊ शकतात. 

वैध परवाना, तरच परवानगीमायक्रोकॉम्प्युटर, मोठे संगणक आणि काही डेटा प्रोसेसिंग यंत्रे यांनाही आयात अंकुश श्रेणीत टाकले आहे. काम झाल्यानंतरही आयात केलेले संगणक विकता येणार नाहीत. 

देशी उत्पादनांना चालनारिलायन्सने ‘जिओबुक’ स्वदेशी लॅपटॉप लॉन्च केला. मध्यंतरी टाटाने आयफोन निर्मिती करणारा प्रकल्प अधिग्रहित केला. तेथे आयफोनची असेंब्ली केली जाणार होती. केंद्राच्या निर्णयानंतर तिथे ॲपलचे अन्य उत्पादनेही तयार केल्यास ‘मेक इन इंडिया’ला चालना मिळेल. 

केंद्र सरकारने लॅपटॉप, टॅबलेट तसेच संगणकाच्या आयातीवर निर्बंध  घातल्यानंतर देशात त्यांच्या निर्मितीला चालना मिळेल.  - अली अख्तर जाफरी, महासंचालक, मैत

टॅग्स :laptopलॅपटॉपchinaचीनIndiaभारत