मसुद अजहरला दहशतवाद्यांच्या यादीत टाकण्याची भारताची मागणी
By Admin | Updated: February 26, 2016 13:29 IST2016-02-26T13:29:49+5:302016-02-26T13:29:49+5:30
जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसुद अजहरचं नाव दहशतवाद्यांच्या यादीत टाकण्यासाठी भारताने संयुक्त राष्ट्र संघ समितीला पत्र पाठवलं आहे

मसुद अजहरला दहशतवाद्यांच्या यादीत टाकण्याची भारताची मागणी
ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. २६ - जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसुद अजहरचं नाव दहशतवाद्यांच्या यादीत टाकण्यासाठी भारताने संयुक्त राष्ट्र संघ समितीला पत्र पाठवलं आहे. सरकारी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारताने संयुक्त राष्ट्र संघ समिती 1267कडे पत्राद्वारे औपचारिक विनंती केली आहे.
जैश-ए-मोहम्मदचं नाव दहशतवादी संघटनांच्या यादीत आहे मात्र त्याच्या प्रमुखाचं नाही ही विसंगती आहे असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप म्हणाले आहेत. भारत या मागणीसाह पुढे जाणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे. आम्ही अल-कायदा, तालिबान तसंच इतर दहशतवादी संघटनांशी संलग्न असलेल्या दहशतवाद्यांची यादी संयुक्त राष्ट्र संघाला दिली आहे. सध्या सर्व प्रक्रिया सुरु असल्याने त्यांची नाव जाहीर करणं शक्य नसल्याचं विकास स्वरुप यांनी सांगितलं आहे. याअगोदर भारताने मसुद अजहरला संयुक्त राष्ट्र संघाकडून बंदी घालण्याची केलेली मागणी केली होती ज्याला चीनने विरोध केला होता.