शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: देशात गेल्या २४ तासांत आतापर्यंतची विक्रमी वाढ; रुग्णसंख्या २० लाखांच्या पार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2020 11:33 IST

आरोग्य मंत्रालयानुसार, मागील २४ तासांत देशात ६२ हजार ५३८ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे.

नवी दिल्ली: कोरोना व्हायरसने जगभरात विळखा घातला आहे. भारतातही कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र याच दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशभरात गेल्या २४ तासांत नव्या ६२,५३८ रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसभरातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी वाढ असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्राालयाने स्पष्ट केले आहे.

आरोग्य मंत्रालयानुसार, मागील २४ तासांत देशात ६२ हजार ५३८ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही २० लाखांच्या पुढे गेली आहे. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २० लाख २७ हजार ७५ इतकी झाली आहे. सध्या ६ लाख ७ हजार ३८४ रुग्णांवर उपचार सुरु आहे. त्याचप्रमाणे देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी आतापर्यत एकूण ४१,५८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.

कोरोनाचा संसर्ग वेगानं वाढत असला तरीही त्यात दिलासा देणारी बाब म्हणजे आतापर्यंत १३ लाख ७८ हजार १०५ लोकांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. देशातला रिकव्हरी रेट ६७.६२% वर पोहोचला आहे. देशात ६ ऑगस्टपर्यत २,२७,२४,१३४ नमुन्यांची चाचणी झाली आहे. यांपैकी गुरुवारी ५,७४,७८३ चाचण्या करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरने दिली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतdocterडॉक्टरNarendra Modiनरेंद्र मोदी