शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या चंद्रयान-2 चे प्रक्षेपण तात्पुरते लांबणीवर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 15:38 IST

भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या ( इस्त्रो)  चंद्रयान-2 या मोहिमेचे प्रक्षेपण पुन्हा एकदा तात्पुरत्या काळासाठी लांबणीवर पडले आहे.

ठळक मुद्देभारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या ( इस्त्रो)  चंद्रयान-2 या मोहिमेचे प्रक्षेपण पुन्हा एकदा तात्पुरत्या काळासाठी लांबणीवर चांद्रयान-2 मोहिमेमध्ये चंद्रावर सॉफ्ट लँडिंग होणार आहे. त्यानंतर एक रोव्हर चंद्राच्या पृष्टभागाचा तपास आणि प्रयोग करणार आहे2018 च्या अखेरच्या महिन्यांमध्ये इस्रो इतर मोहिमांच्या प्रक्षेपणात व्यस्त असल्याने चंद्रयानाचे प्रक्षेपण प्रभावित झाले

बंगळुरू - भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या ( इस्त्रो)  चंद्रयान-2 या मोहिमेचे प्रक्षेपण पुन्हा एकदा तात्पुरत्या काळासाठी लांबणीवर पडले आहे. येत्या 3 जानेवारी रोजी इस्रो  चंद्रयान-2 चे प्रक्षेपण करणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे चंद्राच्या अज्ञात भागात भारताआधी यान उतरवण्याची संधी चीनला मिळाली आहे. चीनचे चांगी-4 हे यान चंद्राच्या कक्षेत पोहोचले असून, ते लवकरच चंद्राचा अद्याप समोर न आलेल्या भागावर उतरणार आहे.  चंद्रयान-2चे लवकरच प्रक्षेपण करण्यात येईल, असे याआधी इस्रोकडून जाहीर करण्यात आले होते.  इस्रो चंद्रयान-2 चे लवकरात लवकर प्रक्षेपण करू इच्छित आहे. मात्र त्याच्या प्रक्षेपणाची तारीख अद्याप निश्चित होऊ शकलेली नाही. दरम्यान, 2018 च्या अखेरच्या महिन्यांमध्ये इस्रो इतर मोहिमांच्या प्रक्षेपणात व्यस्त असल्याने चंद्रयानाचे प्रक्षेपण प्रभावित झाले, असे इस्रोचे चेअरमन सिवन यांनी सांगितले.  ''चंद्रयान-2 च्या प्रक्षेपणाच्चा तारखेबाबत मी सध्यातरी काही सांगू इच्छित नाही. येत्या 10-12 दिवसात याबाबत आम्ही निर्णय घेऊ,'' चीनचे चांगी-4 आणि भारताच्या चंद्रयान-2 यांच्यात चंद्राच्या पृष्टभागावर उतरण्यासाठी स्पर्धा होती. दरम्यान, आता यात चीनच्या यानाने बाजी मारली आहे. हे यान आता चंद्राच्या पृथ्वीपासून दूर असलेल्या भागात उतरणार आहे. तर चंद्रयान-2 चंद्राच्या दक्षिण धृवावर उतरणार आहे. या भागाबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही.  चीनची वृत्तसंस्था शिन्हुआने  आपल्या वृत्तात म्हटले आहे की, चांगी-4 हे यान योजनेनुसार चंद्राच्या कक्षेत पोहोचले आहे. आता ते चंद्राच्या पृथ्वीपासून दूर असलेल्या भागात उतरणार आहे. मात्र हे यान चंद्रावर कधी उतरणार आहे, याबाबात माहिती देण्यात आलेली नाही. दुसरीकडे इस्रोनेसुद्धा चंद्रयान-2 च्या प्रक्षेपणाची तयारी केली आहे. मात्र या यानाचे प्रक्षेपण 2017 आणि 2018 या दोन वर्षांमध्ये दोन वेळा टाळण्यात आले होते. आता चंद्रयान-2कडे चंद्रावर उतरण्यासाठी 16 फेब्रुवारीपर्यंतची मुदत आहे. चांद्रयान-2 मोहिमेमध्ये चंद्रावर सॉफ्ट लँडिंग होणार आहे. त्यानंतर एक रोव्हर चंद्राच्या पृष्टभागाचा तपास आणि प्रयोग करणार आहे.   

टॅग्स :isroइस्रोIndiaभारत