सीमेवर गोळीबाराला भारताचे चोख प्रत्युत्तर, पाकिस्तानचे दोन सैनिक ठार

By Admin | Updated: September 29, 2016 13:06 IST2016-09-29T12:09:53+5:302016-09-29T13:06:29+5:30

सीमेवर वारंवार शस्त्रसंधींचे उल्लंघन करणा-या पाकिस्तानी लष्कराला भारतीय जवानांनी गुरुवारी रात्री चोख प्रत्युत्तर दिले.

India's cautious response to the firing on the border, two Pakistani soldiers killed | सीमेवर गोळीबाराला भारताचे चोख प्रत्युत्तर, पाकिस्तानचे दोन सैनिक ठार

सीमेवर गोळीबाराला भारताचे चोख प्रत्युत्तर, पाकिस्तानचे दोन सैनिक ठार

ऑनलाइन लोकमत 

इस्लामाबाद, दि. २९ - सीमेवर वारंवार शस्त्रसंधींचे उल्लंघन करणा-या पाकिस्तानी लष्कराला भारतीय जवानांनी गुरुवारी रात्री चोख प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानकडून गोळीबार सुरु होताच भारतीय लष्करानेही जोरदार प्रतिहल्ला सुरु केला. यामध्ये दोन सैनिक पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचे पाकिस्तानी लष्कराने रॉयटर्सला सांगितले. 
 
रात्री अडीजच्या सुमारास सुरु झालेला गोळीबार सकाळी ८ वाजेपर्यंत सुरु होता. पाकिस्तानी सैन्याने पूंछ जिल्ह्यातील भारतीय लष्करच्या ठिकाणांवर गोळीबार केला. भीमबेर सेक्टरमध्येही हा गोळीबार झाला. 
 
आणखी वाचा 
 
उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सीमेवरुन भारतीय हद्दीत दहशतवादी घुसवण्यासाठी पाकिस्तानकडून वारंवार गोळीबार करण्यात येतो. 
 
उरीमध्येही अशीच सीमा ओलांडून आलेल्या जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भारताचे १८ जवान शहीद झाले. रात्रभर चाललेल्या या गोळीबारात भारताच्या बाजूला कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. 

Web Title: India's cautious response to the firing on the border, two Pakistani soldiers killed