शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

भारतातील ‘लादेन’ जेरबंद, गुजरात बॉम्बस्फोटांचा मास्टरमाइंड अब्दुल कुरेशीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 4:18 AM

गुजरातमध्ये २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांचा मास्टरमाइंड आणि इंडियन मुजाहिदीनचा सहसंस्थापक तसेच भारतातील ‘लादेन’ म्हणून ओळखला जाणारा अब्दुल सुभान कुरेशी (४६) याला दिल्लीमध्ये शनिवारी रात्री अटक करण्यात आली.

नवी दिल्ली : गुजरातमध्ये २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांचा मास्टरमाइंड आणि इंडियन मुजाहिदीनचा सहसंस्थापक तसेच भारतातील ‘लादेन’ म्हणून ओळखला जाणारा अब्दुल सुभान कुरेशी (४६) याला दिल्लीमध्ये शनिवारी रात्री अटक करण्यात आली. त्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.पोलीस उपायुक्त प्रमोद कुशवाह यांनी सांगितले की, स्टुडंटस् इस्लामिक मूव्हमेंट आॅफ इंडिया (सिमी), इंडियन मुजाहिदीनच्या (आयएम) वाँटेड अतिरेक्यांपैकी एक असलेला अब्दुल सुभान कुरेशी हा नेपाळमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे राहत होता. इंडियन मुजाहिदीनला पुनर्जिवित करण्यासाठी तो भारतात आला होता. २६ जुलै २००८ रोजी अहमदाबादेत २१ साखळी बॉम्बस्फोट झाले होते. कुरैशी उर्फ तौकीर हा एनआयाएला दिल्ली, बंगळुरु आणि मुंबईतील २००६ मधील लोकलच्या बॉम्बस्फोट प्रकरणी हवा होता. गुजरात एटीएस आणि अहमदाबाद क्राइम ब्रँच हे दिल्ली स्पेशल सेलच्या संपर्कात आहेत.आई राहाते मीरा रोडला-अब्दुलची आई ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड येथे राहाते. अब्दुल भारतातून फरार झाल्यापासून तो आजवर कधीही आईला भेटलेला नाही. अब्दुलचे भाऊ व बहिणी उच्चशिक्षित असून त्यांच्यापैकी एकही जण देशविघातक कारवायांमध्ये गुंतलेला नाही. अब्दुल हा भायखळाच्या अँटोनिओ डिसिल्व्हा शाळेत शिकायला होता. त्यानंतर त्यांने कम्प्युटरसंदर्भात शिक्षणही घेतले होते.महाराष्ट्रात उभारायचे होते स्लीपर सेल-महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली व देशातील अन्य ठिकाणच्या महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये इंडियन मुजाहिदीनचे नेटवर्क उभारण्यासाठी स्लीपर सेल तंत्राचा वापर अब्दुलने सुरु केला होता. अब्दुल सुभान कुरेशीचे इंग्रजीवर प्रभुत्व असल्याने तो संभाषणात समोरच्या व्यक्तीवर सहज छाप पाडतो. या भाषाकौशल्याचा वापर अब्दुलने तरुणांना आपल्याकडे वळवून घेण्यासाठी केला. ठाणे व पुण्यातील महाविद्यालयांमध्ये तसेच पुणे विद्यापीठांतील विद्यार्थी हेरुन त्यांना इंडियन मुजाहिदीनच्या स्लीपर सेलमध्ये सामील करण्याचा अब्दुलचा डाव होता.मुंबईतील इसरारमुळे अब्दुल बनला कट्टरपंथी-अब्दुलने बंगळुरु व हैदराबाद येथील आयटी कंपनीत काम केले होते. 1998 साली तो सिमी या संघटनेत सामील झाला. कालांतराने तो सिमीचा कट्टरपंथी कार्यकर्ता बनला व दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होऊ लागला. इंडियन मुजाहिदीनचा सहसंस्थापक तसेच मुंबईतील चिता कॅम्पमध्ये येथील रहिवासी सादिक इसरार याच्यामुळे तो कट्टरपंथी बनला. 2008 साली सिमीचा सरचिटणीस सफदर नागोरी याला अटक झाल्यानंतर अब्दुल सुभान कुरेशी हा या संघटनेचा महत्त्वाचा नेता बनला.2007-08 साली उत्तर प्रदेश, अहमदाबाद, जयपूर, दिल्लीमध्ये घडलेल्या बॉँम्बस्फोटांची जबाबदारी इंडियन मुजाहिदीनने घेतली व तसे मेल पाठवले. त्यानंतर पोलिसांनी अब्दुलचा समावेश वाँटेड दहशतवाद्यांच्या यादीत केला. त्यानंतर तो नेपाळमध्ये पळून गेला होता. तेव्हापासून तो अनेक वर्ष तेथेच राहात होता. बाँम्ब बनविण्यामध्ये अब्दुल तरबेज आहे.

टॅग्स :terroristदहशतवादीNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाNew Delhiनवी दिल्लीMumbaiमुंबई