भारताकडे जगभरातील पर्यटकांना आकर्षिक करण्याची क्षमता - मोदी
By Admin | Updated: January 20, 2017 18:11 IST2017-01-20T18:11:47+5:302017-01-20T18:11:47+5:30
भारताकडे जगभरातील पर्यटकांना आकर्षित करण्याची क्षमता आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले

भारताकडे जगभरातील पर्यटकांना आकर्षिक करण्याची क्षमता - मोदी
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 20 - विविधतेने नटलेल्या भारताकडे जगभरातील पर्यटकांना आकर्षित करण्याची क्षमता आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले. मोदी यांनी पर्यटन, संस्कृती आणि क्रीडा मंत्रालयाच्या संमेलनाला व्हिडिओ काँन्फ्रसिंगद्वारे संबोधित केले. त्यावेळी पंतप्रधानांनी पर्यटन, क्रीडा आणि संस्कृतीसह विविध विषयांवर भाष्य केले.
यावेळी मोदी म्हणाले, "भारताकडे जगभरातील पर्यटकांना आकर्षित करण्याची क्षमता आहे. सद्यस्थितीत देशातील तरुणाच्या मनात श्रमप्रतिष्ठा जागवण्याची गरज आहे. कष्टाची कामे करण्यासाठीह त्यांना तयार करावे लागेल."
नियोजित विकासासाठी प्रयत्न केल्यास आपण कमीत कमी खर्चात अधिकाधिक काम करू शकतो, असेही मोदींनी यावेळी सांगितले. "स्वच्छ भारत अभियानाला अनेक कलाकार आणि अनेक संस्थांनी पाठिंबा दिला, काही कलाकांरांनी रेल्वे स्थानकांवर चित्रे काढली. तरुणांकडील या सृजनशिलतेचा उपयोग केला पाहिजे. त्यांच्यातील क्षमतेचा उपयोग झाला पाहिजे," असेही मोदी म्हणाले.
यावेळी देशातील क्रीडाक्षेत्रातील परिस्थितीचाही मोदींनी आढावा घेतला. आपल्या देशात क्रिकेटशिवाय अन्य खेळांमध्येही प्रतिभा आहे. पण जोपर्यंत नियमितपणे स्पर्धा होणार नाहीत तोपर्यंत देशात खेळाडू तयार होणार नाहीत, असे मोदींनी सांगितले.