नवी दिल्ली: परदेशी बँकांमध्ये जमा असलेल्या भारतीयांच्या काळ्या पैशाची कायम चर्चा होते. परदेशातील बँकांमध्ये जमा असलेला काळा पैसा भारतात आणण्याचं आश्वासन भाजपानं 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिलं होतं. आता परदेशी बँकांमध्ये असलेल्या भारतीयांच्या काळ्या पैशाशी संबंधित काही आकडे समोर आले आहेत. ही आकडेवारी डोळे विस्फारुन टाकणारी आहे. 1980 ते 2010 या कालावधीत देशातून जवळपास 246.48 अब्ज डॉलर (17,25,300 कोटी रुपये) ते 490 अब्ज डॉलर (34,30,000 कोटी रुपये) इतका काळा पैसा परदेशात गेल्याची आकडेवारी तीन दिग्गज संस्थांनी समोर आणली आहे. एनआयपीएफपी, एनसीएईआर आणि एनआयएफएम या तीन संस्थांनी काळ्या पैशाशी संबंधित आकडेवारी प्रसिद्ध केली. या तीन संस्थांनी दिलेल्या आकडेवारीवरुन तयार करण्यात आलेला एक अहवाल काल (सोमवारी) संसदेत मांडण्यात आला. रियल इस्टेट, खाणकाम, फार्मासिटीकल, पान मसाला, गुटखा, तंबाखू, चित्रपट, शिक्षण या क्षेत्रांमधून काळ्या पैशाची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होत असल्याचं निरीक्षण अहवालात नोंदवण्यात आलं.
परदेशात भारतीयांचा 'इतका' काळा पैसा; आकडा पाहून डोळे विस्फारतील
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 08:34 IST