व्हेकेशनसाठी भारतीयांची न्यूयॉर्क शहराला पसंती !
By Admin | Updated: February 9, 2017 22:00 IST2017-02-09T21:50:37+5:302017-02-09T22:00:05+5:30
व्हेकेशनसाठी न्यूयॉर्क शहरातील पर्यटन क्षेत्राला सर्वाधिक जास्त भारतीयांनी पसंती दाखविली आहे.

व्हेकेशनसाठी भारतीयांची न्यूयॉर्क शहराला पसंती !
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 09 - व्हेकेशनसाठी न्यूयॉर्क शहरातील पर्यटन क्षेत्राला सर्वाधिक जास्त भारतीयांनी पसंती दाखविली आहे.
कायक या ट्रॅव्हल सर्च इंजिनने केलेल्या सर्वेक्षणानुसार, भारतीय नागरिकांनी प्रवासासाठी किंवा पर्यटनासाठी शोधलेल्या शहरांपैकी टॉप 3 मध्ये न्यूयॉर्क, दुबई आणि लंडन या शहरातील पर्यटन क्षेत्राला जास्त सर्वाधिक पसंत केले आहे. विशेष, म्हणजे देशातील नागरिकांनी ऑनलाइनच्या माध्यमातून सर्च केलेला हा अहवाल आहे. तसेच, गेल्यावर्षीच्या तुलनेत भारतीय पर्यटकांनी आम्सटरडॅम, अथेन्स आणि मेल यासारख्या शहरांना सुद्धा चांगली पसंती दाखविली आहे.
याचबरोबर, या सर्वेक्षणातून असे लक्षात आले आहे की, जास्त करुन भारतीय नागरिक एखाद्या ठिकाणी जायचे असेल शुक्रवारपासून त्या प्रवासाला सुरुवात करतात. तसेच, पुणे आणि जयपूर येथील प्रवाशांच्या तुलनेत अहमदाबाद, मुंबई आणि हैदराबाद येथील प्रवाशांनी सरासरी मोठ्या ट्रीपचा कालावधी निवडल्याचे दिसून आले आहे.