स्वीस बँकांमधील भारतीयांचा पैसा वाढला

By Admin | Updated: June 20, 2014 00:25 IST2014-06-20T00:25:53+5:302014-06-20T00:25:53+5:30

बहुचर्चित गोपनीयतेच्या विरोधात संपूर्ण जगातून नाराजी व्यक्त होत असतानाच भारतीयांनी स्वीस बँकांत ठेवलेला पैसा वाढून 2 अब्ज स्वीस फ्रँक म्हणजेच 14,क्क्क् कोटी रुपये झाला आहे.

Indians' money in Swiss banks increased | स्वीस बँकांमधील भारतीयांचा पैसा वाढला

स्वीस बँकांमधील भारतीयांचा पैसा वाढला

>14,क्क्क् कोटी : स्वीस नॅशनल बँकेने जारी केले आकडे
नवी दिल्ली : स्वीत्ङरलडमधील बँकांच्या बहुचर्चित गोपनीयतेच्या विरोधात संपूर्ण जगातून नाराजी व्यक्त होत असतानाच भारतीयांनी स्वीस बँकांत ठेवलेला पैसा वाढून 2 अब्ज स्वीस फ्रँक म्हणजेच 14,क्क्क् कोटी रुपये झाला आहे. 
स्वीत्ङरलडची केंद्रीय बँक असलेल्या स्वीस नॅशनल बँकेने (एसएनबी) ताजी आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार, 2क्13 या वर्षात भारतीयांनी स्वीस बँकांत ठेवलेल्या पैशांत 4क् टक्क्यांची वाढ झाली आहे. 2क्12 च्या अखेर्पयत स्वीस बँकांत भारतीयांचे 1.42 अब्ज स्वीस फ्रँक जमा होते. या उलट इतर देशांच्या नागरिकांकडून स्वीस बँकांत जमा होणा:या पैशांत घट झाली आहे. 2क्13 च्या अखेरीस इतर देशांतील नागरिकांचे 1,32क् अब्ज स्वीस फ्रँक स्वीस बँकांत होते. अमेरिकी चलनात ही रक्कम 1.56क् अब्ज डॉलर तर भारतीय चलनात 9क् लाख कोटी रुपये इतकी होते. 2क्11 मध्ये काळ्या पैशाबाबत मोठय़ा प्रमाणात चर्चा झाल्यामुळे 2क्12 या वर्षात भारतीयांच्या स्वीस बँकांतील पैशात मोठी घट झाली होती. 
प्राप्त माहितीनुसार, 2क्13 च्या अखेर्पयत स्वीस बँकांमध्ये भारतीयांनी तसेच भारतीय संस्थांनी 1.95 अब्ज स्वीस फ्रँक थेट जमा केले आहेत. उरलेले 7.73 कोटी स्वीस फ्रँक संपत्ती व्यवस्थापन संस्थांच्या माध्यमातून जमा करण्यात आले आहेत. 
जगभरातील काळ्या पैशासाठी स्वीत्र्झलँड स्वर्गासारखे सुरक्षित स्थान मानले जाते. जगभरातील अब्जाधीश मंडळी आपला पैसा स्वीस बँकांमध्ये साठवून ठेवतात. स्वीस बँका आपल्या ्रग्राहकांची माहिती पूर्णत: गोपनिय ठेवतात. सरकारलाही ही माहिती दिली जात नाही. एवढय़ा एका कारणामुळे स्वीत्ङरलड काळ्या पैशाचे आश्रयस्थान बनले आहे.  भारतीय अब्जाधीश मंडळी स्वीस बँकांमध्ये काळा पैसा दडवून ठेवतात, असा आरोप फार पूर्वीपासून होतो. यंदाचा लोकसभा निवडणुकीआधी भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांनी काळ्या पैशाचा मुद्दा उपस्थित केला होता. नंतर नरेंद्र मोदी यांनी हा मुद्दा प्रचारात आणला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
-झुरिक स्थित एसएनबीचे ताजे आकडे जाहीर होण्याचा काळ ऐन मोक्याचा मानला जात आहे. विदेशी ग्राहकांच्या माहितीचे आदान-प्रदान करण्यासाठी स्वीस सरकारवर दबाव वाढलेला आहे. नेमक्या याच काळात एसएनबीने ताजे आकडे जाहीर केले आहेत. 
 
-विदेशात जमा असलेल्या काळ्या पैशाच्या चौकशीसाठी भारत सरकारने एसआयटीची स्थापना केली आहे. स्वीस बँकांमधील पैसाही एसआयटीच्या रडारवर आहे.

Web Title: Indians' money in Swiss banks increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.