अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा सत्तेवर आले आहेत. ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सला भेट दिल्यानंतर अमेरिकेला जाणार आहेत. त्यांचा दौरा १२ ते १३ फेब्रुवारी दरम्यान अपेक्षित आहे. या काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांची भेट घेतील. दोन्ही नेत्यांमधील ही भेट अनेक अर्थांनी महत्त्वाची मानली जात आहे.
२० जानेवारी रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींशी ही त्यांची पहिलीच भेट आहे. शपथविधी सोहळ्यानंतर ट्रम्प यांच्याशी द्विपक्षीय बैठक करणारे पंतप्रधान मोदी हे दुसरे जागतिक नेते असतील. यापूर्वी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी ट्रम्प यांची भेट घेतली होती. या काळात दोन्ही जागतिक नेत्यांमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते.
डोनाल्ड ट्रम्प यांचे मेक्सिकोवर अतिक्रमण; खाडीचे नाव बदलून अमेरिकन केले
याआधी दोन्ही नेत्यांनी सातवेळी द्विपक्षीय चर्चा केली आहे. पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील पहिली बैठक २६ जून २०१७ रोजी वॉशिंग्टनमध्ये झाली. दुसरी बैठक ३० नोव्हेंबर २०१८ रोजी अर्जेंटिनामधील ब्युनोस आयर्स येथे झाली. तिसरी बैठक २८ जून २०१९ रोजी जपानमधील ओसाका येथे, चौथी बैठक २६ ऑगस्ट २०१९ रोजी फ्रान्समध्ये आणि पाचवी बैठक २२ सप्टेंबर २०१९ रोजी अमेरिकेतील ह्युस्टन येथे झाली. दोन्ही नेत्यांची सहावी बैठक २४ सप्टेंबर २०१९ रोजी अमेरिकेतील न्यू यॉर्क येथे झाली, तर सातवी बैठक २४-२५ फेब्रुवारी २०२० रोजी अहमदाबाद येथे झाली. या दृष्टीने, दोन्ही नेत्यांची ही आठवी बैठक खूप महत्त्वाची आहे.
ट्रम्प यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. दुसऱ्या कार्यकाळात ट्रम्प आणि मोदी यांची ही पहिलीच भेट असेल. या काळात, भारत-अमेरिका जागतिक सामरिक रणनीती अधिक मजबूत करणे, व्यापारापासून ते अणुऊर्जा, संरक्षण, तंत्रज्ञान, इंडो-पॅसिफिक प्रदेशात सहकार्य वाढवणे आणि दहशतवादाचा संयुक्तपणे मुकाबला करण्यावर चर्चा होऊ शकते. या काळात, पंतप्रधान मोदी ट्रम्प यांच्याशी भारत-मध्य पूर्व युरोप कॉरिडॉरबद्दलही चर्चा करू शकतात.
१०४ भारतीयांना केले डिपोर्ट
दुसरीकडे, डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर अवैध पद्धतीने अमेरिकेत प्रवेश करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली. यामध्ये आतापर्यंत १०४ भारतीयांना हद्दपार केले आहे, या नागरिकांना बेड्या लावून अमृतसर विमानतळावर सोडण्यात आले. यावरुन लोकसभेत गोंधळ निर्माण झाला होता. या मुद्द्यावर पीएम मोदी ट्रम्प यांच्यासोबत चर्चा करणार का? अशा चर्चा सुरू आहेत.