अमेरिकेत भारतीय महिलेची मुलासह हत्या

By Admin | Updated: March 24, 2017 17:02 IST2017-03-24T16:44:17+5:302017-03-24T17:02:08+5:30

अमेरिकेत भारतीय महिलेची सात वर्षीय मुलासोबत हत्या करण्यात आली असल्याचं समोर आलं आहे

Indian woman murdered with child in US | अमेरिकेत भारतीय महिलेची मुलासह हत्या

अमेरिकेत भारतीय महिलेची मुलासह हत्या

ऑनलाइन लोकमत
न्यूजर्सी, दि. 24 - अमेरिकेत भारतीय महिलेची सात वर्षीय मुलासोबत हत्या करण्यात आली असल्याचं समोर आलं आहे. न्यूजर्सीमधील राहत्या घरी मायलेकांचा मृतदेह आढळून आला. हे कुटुंब आध्रप्रदेशातील आहे. एन शशिकला आणि त्यांचा मुलगा अनिश साई अशी त्यांची ओळख पटली आहे. शशिकला यांचे पती हनुमंत राव कामावरुन घरी आले असता त्यांना घरात दोन्ही मृतदेह आढळून आले. 
 
आपल्या पत्नी आणि मुलाची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचं हनुमंत राव यांनी सांगितलं आहे. हनुमंत आणि शशिकला हे दोघंही सॉफ्टवेअर प्रोफेशनल आहेत. शशिकला घरी राहूनच काम करायच्या. हे दाम्पत्य गेल्या नऊ वर्षांपासून अमेरिकेत वास्तव्याला आहेत. 
 
शशिकला यांच्या कुटुंबियांनी मात्र आपल्या जावयावरच संशय व्यक्त केला असून त्याचे विवाहबाह्य संबंध होते असा आरोप केला आहे. या संबंधातूनच त्याने हत्या केली असल्याचा आरोप शशिकला यांच्या आईने केला आहे.
 
अमेरिकेत गेल्या काही महिन्यांपासून भारतीयांवर हल्ले होत असून या घटनेमुळे चिंतेचे वातावरण आहे.  तेलंगणातील 32 वर्षीय एअरोनॉटिकल इंजिनिअर श्रीनिवास कुचिभोटला यांची 23 फेब्रुवारीला गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. तर 10 फेब्रुवारीला तेलंगणातीलच वामिशी रेड्डी यांची त्याच्या अपार्टमेंटमधील गराजमध्ये होळ्या घालून हत्या करण्यात आली होती.
 

Web Title: Indian woman murdered with child in US