शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय विद्यार्थ्यांचे परदेशी शिक्षणाचे स्वप्न नियम अन् खर्चामुळे झाले अवघड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 13:08 IST

या देशांत भारतीयांसाठी अडचणी वाढल्या... -

नवी दिल्ली : परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे अनेक भारतीय विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. वर्ष २०२२ मधील ९,०७,४०४ भारतीय विद्यार्थ्यांच्या तुलनेत २०२४ मध्ये १३.३५ लाखांहून अधिक भारतीय परदेशात उच्चशिक्षण घेत आहेत. त्यापैकी चार लाखांहून अधिक भारतीय विद्यार्थी एकट्या कॅनडात आहेत. परंतु कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनसारख्या देशांनी कठोर नियम आणल्याने आणि शिक्षणाचा खर्च वाढल्याने भारतीय विद्यार्थ्यांना आता अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

भारतीयांच्या आवडीचे देश -- विद्यार्थीकॅनडा     ४,२७,००० अमेरिका     ३,३७,६३० ऑस्ट्रेलिया     १,२२,२०२ जर्मनी     ४२,९९७ ब्रिटन     १८,५०० 

भारतात येईनात परदेशी विद्यार्थी- परदेशी विद्यापीठांकडे भारतीयांचे आकर्षण वाढत असताना, उच्चशिक्षणासाठी भारतात येणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत अद्याप वाढ झालेली नाही.- २०२३ मध्ये केवळ ४०,४३१ परदेशी विद्यार्थी उच्चशिक्षणासाठी भारतात आले होते, तर याच कालावधीत शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या ७.६५ लाख होती.

या देशांत भारतीयांसाठी अडचणी वाढल्या- कॅनडा : कॅनडाने पुढील दोन वर्षांसाठी केवळ ३,६४,००० विद्यार्थ्यांना येथे जाता येईल. गेल्या वर्षी ५,६०,००० जणांना यासाठी परवानगी देण्यात आली होती. नव्या निर्णयामुळे मोठ्या संख्येने भारतीयांना बाहेर पडावे लागण्याचा धोका आहे. स्टडी परमिटसाठी तुमच्या बँक खात्यांमध्ये १२,६०,७०० रुपये असणे आवश्यक. - ब्रिटन : येथील परदेशी विद्यार्थ्यांसाठी डिपेंडेंट व्हिसाचे नियम रद्द केल्यामुळे, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना ब्रिटनमध्ये आणू शकणार नाहीत. मात्र, पीएच.डी किंवा पोस्ट-डॉक्टरेट अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना या नियमातून सूट देण्यात आली होती.- ऑस्ट्रेलिया : परदेशी विद्यार्थ्यांसाठी व्हिसा शुल्क दुप्पट करण्यात आले. वर्ष २०२५ पर्यंत परदेशी विद्यार्थ्यांची नोंदणी २,७०,००० पर्यंत मर्यादित ठेवणार. सरकारला विक्रमी स्थलांतराला आळा घालायचा आहे, ज्यामुळे घर भाड्याच्या किमती वाढल्या आहेत.- अमेरिका : नवीन नियमानुसार परदेशी विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासादरम्यान सलग पाच महिन्यांपेक्षा जास्त वेळ देशाबाहेर घालवता येणार नाही. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या इंटर्नशिपपासून सुट्टीपर्यंतच्या योजनांवर होत आहे. एफ, एम आणि जे विद्यार्थी व्हिसा अर्जदारांना प्रोफाईल तयार करताना पासपोर्ट माहिती द्यावी लागेल. 

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थी