ब्रिटनमध्ये भारतीय विद्यार्थी ठरला सर्वात बुद्धिमान
By Admin | Updated: August 24, 2014 02:25 IST2014-08-24T02:25:27+5:302014-08-24T02:25:27+5:30
भारतीय वंशाचा विद्यार्थी असानिश कल्याणसुंदरम (18) याने मुख्य पाच विषयांत 100 टक्के गुण मिळविले आहेत.

ब्रिटनमध्ये भारतीय विद्यार्थी ठरला सर्वात बुद्धिमान
लंडन : भारतीय वंशाचा विद्यार्थी असानिश कल्याणसुंदरम (18) याने मुख्य पाच विषयांत 100 टक्के गुण मिळविले आहेत. कल्याणसुंदरमने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र,जीवशास्त्र, गणित व क्रिटिकल थिंकिंग या मुख्य 5 विषयांत 1क्क् पैकी 1क्क् गुण मिळविले.
ब्रिटनमध्ये ए दर्जा मिळविण्यासाठी असे गुण आवश्यक असून आज त्याला ब्रिटनमधील सर्वात बुद्धिमान विद्यार्थी समजले जात आहे. या यशाने मी खूपच आनंदित झालो असल्याची प्रतिक्रिया कल्याणसुंदरमने व्यक्त केली आहे. तो आता केंब्रिज विद्यापीठात वैद्यकीय शिक्षण घेणार आहे.
असानिश कल्याणसुंदरम हा लंकाशायरमधील बर्नले येथे आई सुजाता हिच्यासोबत राहतो. नुकतेच कल्याणसुंदरमने डय़ूक ऑफ एडिनबर्गचे सुवर्णपदकही पटकाविले होते. असानिश हा ए लेव्हलला असलेल्या अभ्यासाशिवाय आव्हानात्मक अभ्यासाच्या सतत शोधात असायचा. (वृत्तसंस्था)