काश्मीरमध्ये भारतीय जवान महिलांवर बलात्कार करतात, कन्हैयाचं वादग्रस्त वक्तव्य

By Admin | Updated: March 9, 2016 09:23 IST2016-03-09T09:23:10+5:302016-03-09T09:23:10+5:30

मी भारतीय सैन्याचा आदर करतो मात्र भारतीय जवान काश्मीरमध्ये महिलांवर बलात्कार करतात असं वादग्रस्त वक्तव्य कन्हैय्या कुमारने केलं आहे

Indian soldiers raped women in Kashmir, controversial statement of Kanhaiya | काश्मीरमध्ये भारतीय जवान महिलांवर बलात्कार करतात, कन्हैयाचं वादग्रस्त वक्तव्य

काश्मीरमध्ये भारतीय जवान महिलांवर बलात्कार करतात, कन्हैयाचं वादग्रस्त वक्तव्य

>ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. ९ - जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमार पुन्हा एकदा वादात अडकण्याची शक्यता आहे. भारतीय जवान काश्मीरमध्ये महिलांवर बलात्कार करत असल्याचं वादग्रस्त वक्तव्य कन्हैय्या कुमारने केलं आहे. 
 
झी न्यूजने दिलेल्या वृत्ताप्रमाणे जेएनयूमधील कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधताना कन्हैय्या कुमारने हे वक्तव्य केलं आहे. जागतिक महिला दिनानिमित्त कन्हैय्या कुमारने विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. मी भारतीय सैन्याचा आदर करतो मात्र भारतीय जवान काश्मीरमध्ये महिलांवर बलात्कार करतात. जम्मू-काश्मीरमधून वादग्रस्त सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा(अफ्सपा) हटवण्यासाठी तसंच मानवाधिकारांचं होणा-या उल्लंघनाविरोधात आवाज उठवणार असल्याचं कन्हैय्या कुमार यावेळी बोलला आहे. 
 
अफजल गुरुच्या समर्थनार्थ जेएनयू कॅम्पसमध्ये 9 फेब्रुवारीला आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात देशविरोधी घोषणा दिल्याने कन्हैय्या कुमारला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. 
 

Web Title: Indian soldiers raped women in Kashmir, controversial statement of Kanhaiya