पाक सैन्याच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद

By Admin | Updated: July 16, 2014 14:25 IST2014-07-16T13:58:27+5:302014-07-16T14:25:26+5:30

जम्मू येथे सीमारेषेवर पाक सैन्याने केलेल्या गोळीबारात भारताचा एक जवान शहीद झाला आहे.

Indian soldier martyrs in the firing of Pak | पाक सैन्याच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद

पाक सैन्याच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद

 ऑनलाइन टीम

श्रीनगर, दि. १६-  जम्मू - काश्मीर येथील सीमा रेषेवर पाकिस्तान सैन्याने शस्त्रसंधींचे उल्लंघन करत बुधवारी दुपारी भारतीय सैन्याच्या चौकींवर गोळीबार केला. या गोळीबारात एक जवान शहीद झाला असून दोन जवान जखमी झाले आहेत. वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करणा-या पाकिस्तानविरोधात मोदी सरकार आता काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे . 

जम्मू येथील आर. एस पूरा सेक्टरमधील पीतल पोस्ट येथे दुपारी १२ ते १२.२० दरम्यान पाकिस्तान सैन्याने अंधाधूंद गोळीबार केेला. या गोळीबारात पीतल पोस्ट येथे तैनात असलेले सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) तीन जवान गंभीर झाले. यातील एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. तर दोन जवान गंभीर जखमी झाले. जखमींवर जम्मूतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  

Web Title: Indian soldier martyrs in the firing of Pak