शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

धावत्या ट्रेनमध्ये मिळणार 'मसाज' सर्व्हिस; रेल्वेची नवीन सेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2019 17:45 IST

देशातील विविध भागात इंदोरहून सुटणाऱ्या 39 ट्रेनमध्ये मसाज सुविधा प्रवाशांना मिळणार आहे.

नवी दिल्ली : लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आराम मिळावा, यासाठी रेल्वे प्रशासन सतत अनेक सुविधा उपलब्ध करुन देत आहे. धावत्या ट्रेनमध्ये प्रवाशांना चांगल्या रेस्टॉरंटमधील जेवण असो किंवा वंदे भारत यासारख्या गाड्यांमध्ये मिळणाऱ्या विमानासारख्या सुविधा. यातच आता रेल्वे प्रवाशांसाठी खास सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. आता धावत्या ट्रेनमध्ये प्रवाशांना मसाज करुन घेण्याची सुविधा देण्यात येणार आहे. ही सुविधा खासकरुन इंदूरहून सुटणाऱ्या 39 ट्रेनमध्ये असणार आहे.

रेल्वे प्रवाशांना मसाजची सुविधा (Massage Service) उपलब्ध करुन दिल्यानंतर रेल्वे प्रशासनाला दरवर्षी जवळपास 20 लाख रुपयांचा अतिरिक्त फायदा होऊ शकतो. तसेच, जवळपास 90 लाख रुपयांची अतिरिक्त तिकीट विक्री सुद्धा होऊ शकते, असे विभागीय रेल्वे व्यवस्थापक आर.एन. सुनकर यांचे म्हणणे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रतलाम रेल्वे विभागाने न्यू इनोव्हेटिव्ह नॉन फेअर रेव्हेन्यू  आयडियाज स्कीम (एनआयएनएफआरआयएस) मार्फत लायसन्स ऑफ अग्रिमेंट (एलओए) जारी करण्यात आले आहे. 

100 रुपयांत मिळणार मसाज सुविधादेशातील विविध भागात इंदोरहून सुटणाऱ्या 39 ट्रेनमध्ये मसाज सुविधा प्रवाशांना मिळणार आहे. यासाठी प्रत्येक गाडीत दोन अनुभवी व्यक्ती असणार आहे. तसेच, या सेवेसाठी 100 रुपये प्रवाशाला मोजावे लागणार आहेत. तसेच, या व्यक्तींचे फोन नंबर टीटीई आणि कोचमध्ये उपलब्ध असणार आहे. ज्यावेळी गरज असेल, त्यावेळी प्रवासी फोन करुन मसाज करणाऱ्या व्यक्तीला बोलवू शकतो. प्रवासी या सेवेचा फायदा सकाळी सहा ते रात्री दहावाजेपर्यंत घेऊ शकणार आहेत.    

ही सुविधा यशस्वी झाली तर.... रेल्वे सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेने पहिल्यांचा अशी सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करुन देत आहे. इंदूरमधील सुटणाऱ्या गाड्यांमध्ये ही सुविधा यशस्वी झाली तर रतलाम, उज्जैनहून सुटणाऱ्या गाड्यांमध्येही प्रवाशांसाठी मसाजची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.    

टॅग्स :railwayरेल्वे