शहरं
Join us  
Trending Stories
1
Solapur: पाणी देण्याचे वचन न पाळणाऱ्या शरद पवारांना धडा शिकवा! माळशिरसच्या सभेत नरेंद्र मोदींचा घणाघात
2
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
3
“कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले
4
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?
5
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
6
भाग्यवान! अवघ्या 210 रुपयांत मिळाली 10 लाखांची कार; शेतकऱ्याचं 'असं' फळफळलं नशीब
7
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
8
“वर्षानुवर्षे उत्तर मुंबईची सेवा करत राहीन”; पियूष गोयल यांनी व्यक्त केला विश्वास, उमेदवारी अर्ज भरला
9
'ती' कविता ऐकून थेट उद्धव ठाकरेंचा संकर्षण कऱ्हाडेला फोन, म्हणाले...
10
"भारत महासत्ता बनतोय, आम्ही भीक मागतोय", पाकिस्तानच्या संसदेत भारताचे गोडवे
11
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
12
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
13
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
14
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
15
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
16
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
17
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
18
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
19
May Born Astro: मे महिन्यात जन्मलेले लोक म्हणजे चेहऱ्याने लोभस, डोक्याने तापट आणि लहरी स्वभावाचे मिश्रण!
20
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार

रेल्वे अडीच तास लेट, बहिणीचा पेपर चुकेल; भावाच्या ट्विटनंतर ट्रेन सुस्साट सुटली अन्...

By कुणाल गवाणकर | Published: February 04, 2021 3:40 PM

विद्यार्थिनीचा पेपर चुकू नये म्हणून रेल्वेनं वेग वाढवला; एका ट्विटच्या आधारे विद्यार्थिनीला मदत

वाराणसी: लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या अनेकदा उशिरा पोहोचतात. त्यामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागतो. असाच काहीसा प्रकार एका विद्यार्थिनीसोबत घडला. त्यामुळे परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास उशीर होऊन वर्ष वाया जातं की काय, अशी भीती तिला वाटू लागली. मात्र एका ट्विटमुळे सगळंच बदललं. ट्रेन इतकी वेगानं पळू लागली की विद्यार्थिनी १ तास आधीच परीक्षा केंद्रावर पोहोचली. विद्यार्थिनीचं वर्ष फुकट जाऊ नये, तिचा पेपर चुकू नये यासाठी रेल्वेनं दाखवलेल्या या कार्यक्षमतेचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.गाझीपूरच्या नाजिया तबस्सुमला डीएलएडचा पेपर देण्यासाठी वाराणसीतल्या वल्लभ विद्यापीठ बालिका इंटर कॉलेजमध्ये जायचं होतं. बुधवारी दुपारी१२ वाजता तिचा पेपर होता. तिनं छपरा-वाराणसी सिटी एक्स्प्रेससाठी मऊमधून तिकीट आरक्षित केलं होतं. एक्स्प्रेस सकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी मऊला यायला हवी होती. मात्र ती तब्बल २ तास ५३ मिनिटं उशिरा मऊला आली. ट्रेन ९ वाजून १८ मिनिटांनी मऊला पोहोचली.दारू न पिताच या महिलेला चढते नशा, लिवरही झालं खराब; कारण वाचून व्हाल अवाक्...नाजियाचा पेपर चुकणार अशी भीती वाटू लागल्यानं तिचा भाऊ अन्वर जमाल यांनी रेल्वेला टॅग करत एक ट्विट केलं. 'ट्रेन २ तास २७ मिनिटं उशिरानं धावते आहे. वाराणसीत दुपारी १२ वाजता माझ्या बहिणीला पेपर द्यायचा आहे. कृपया मदत करा,' असं जमालनं ट्विटमध्ये म्हटलं. या ट्विसोबत त्यानं नाजियाच्या पेपरचं वेळापत्रक, ट्रेनचा क्रमांक आणि पीएनआर क्रमांक शेअर केला. अन्वरच्या ट्विटला रेल्वेनं लगेच उत्तर दिलं. त्यांनी त्याचा मोबाईल नंबर मागितला आणि तातडीनं व्यवस्था करू असं आश्वासन दिलं.'या' तरूणाला मिळालं नवं जीवन, डॉक्टरांनी लावला दुसऱ्याचा चेहरा आणि दोन्ही हात...अन्वरच्या एका ट्विटनंतर रेल्वे प्रशासनानं वेगानं चक्रं फिरवली. थेट कंट्रोल रुमला मेसेज केला गेला. ट्रेनचा वेग वाढवण्यात आला. त्यामुळे तीन तास उशिरा पोहोचू शकणारी ट्रेन दोन तास उशिरा (११ वाजता) वाराणसीला पोहोचली. बहिण परीक्षा केंद्रावर पोहोचताच अन्वरनं ट्विट करून रेल्वेचे आभार मानले. बलिया-फेकना दरम्यान स्पीड ट्रायल सुरू असल्यानं ब्लॉक सुरू होता. मात्र विद्यार्थिनीचा पेपर चुकण्याची शक्यता असल्यानं तातडीनं मदत करण्याची माहिती रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे