शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Indian Railway: काय सांगता, कचोरी घेण्यासाठी ड्रायव्हरने चक्क रेल्वे थांबवली, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 16:34 IST

राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील ही घटना असून एनडीटीव्हीने एका व्हायरल व्हिडिओच्या आधारे याबाबतचे वृत्त दिले आहे.

अलवर - काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या एका रेल्वे ड्रायव्हरने दही खरेदी करण्यासाठी चक्क ट्रेनच थांबवली होती. लाहोरनजीक एका रेल्वे स्टेशनजवळ ड्रायव्हरने हे कृत्य केलं होतं. लोकांच्या निदर्शनास ही बाब येताच, गोंधळ उडाला होता. पाकिस्तानमधील या कृत्याची पुनरावृत्ती भारतात झाल्याचं दिसून आलं. त्यामध्ये, येथील रेल्वे चालकाने कचोरी खाण्यासाठ चक्क ट्रेन थांबवल्याची घटना समोर आली आहे. 

राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील ही घटना असून एनडीटीव्हीने एका व्हायरल व्हिडिओच्या आधारे याबाबतचे वृत्त दिले आहे. अलवर जिल्ह्यानजीकच्या एका स्टेशनजवळची ही घटना असल्याचे उघडकीस आली आहे. या व्हायरल व्हिडिओत दिसून येते की, एक व्यक्ती हातात कचोरीचं पॅकेट घेऊन उभा आहे. थोड्याच वेळात रेल्वे तेथे पोहोचते. त्यावेळी, ती व्यक्ती हातातील कचोरीचं पॅकेट रेल्वे इंजिनच्या ड्रायव्हरकडे देते. त्यानंतर, कचोरी घेताच ट्रेन निघून जाते. या व्हिडिओतून एक गोष्ट लक्षात येते की, ट्रॅकवर उभारलेल्या व्यक्तीला अगोदरच माहिती होते की ट्रेन येत असून ड्रायव्हर गाडी थांबविणार आहे. विशेष म्हणजे कचोरीच्या नादात फाटकाबाहेर लोकांना काही वेळ वाट पहावी लागली. कचोरी, ड्रायव्हर आणि व्यक्तीची ही घटना अनेकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, हा व्हिडिओ पाहून अनेकांना पाकिस्तानच्या त्या घटनेची आठवण झाली. ज्यामध्ये, दही घेण्यासाठी ट्रेन चालकाने चक्क रेल्वे थांबवली होती. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेRajasthanराजस्थानSocial Viralसोशल व्हायरल