शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय गोगलगाय खाते; लेटलतिफ रेल्वेने साडेतीन वर्षांनंतर पोहोचवले खत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2018 15:48 IST

बुलेट ट्रेनच्या वेगवान प्रवासाआधी सामान्य गाड्या, मालगाड्या वेळेवर पोहोचण्याइतपत तरी वेगाने धावतील का?

नवी दिल्ली- एखादे पत्र चार वर्षांनी मिळाले, दहा वर्षांनी पुन्हा फिरुन पाठवणाऱ्या व्यक्तीकडे आले असल्या बातम्या पूर्वीच्या काळी येत असत. पोस्ट खात्याच्या कारभारावर तेव्हा टीका होत असे किंवा तो उपहासाचा विषय होत असे. मात्र भारतीय रेल्वेने मात्र यासर्वावर कडी करत एक विक्रम स्थापन केला आहे. 2014 साली पाठवलेले खत रेल्वेने संबंधित स्थळी 2018 साली पोहोचवले आहे. जपानमध्ये एका मिनिटाने ट्रेन लवकर किंवा उशिरा सुटली तर संपूर्ण खाते माफीनामा देते. पण भारतीय रेल्वेच्या विक्रमावर आता प्रतिक्रिया देणंही कठिण झाले आहे.आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून मालगाडीतून उत्तरप्रदेशातील बस्ती जिल्ह्यात पोहोचवण्यासाठी खत पाठवले गेले. 2014 मध्ये ही मालगाडी तेथून निघाली. तिला 1400 किमी अंतर पार करुन बस्ती येथे जायचे होते. या खताची किंमत 10 लाख इतकी होती. बस्ती येथे खताची डिलिव्हरी झाली नसल्याचे लक्षात येताच भारतीय रेल्वेशी संपर्क करण्यात आला. मात्र रेल्वेला हे डबे शोधता आले नाहीत. हे डबे भारतभर एका स्टेशनमागे दुसऱ्य़ा स्टेशनमध्ये फिरत राहिले आणि शेवटी 3.5 वर्षांनी बस्ती येथे पोहोचले आहेत. यामधील सर्व खत खराब झाले असून त्याचे मालक रामचंद्र गुप्ता यांनी ते स्विकारण्यास नकार दिला आहे. आपण गेली साडेतीन वर्षे रेल्वेक़डे चौकशी केली मात्र रेल्वेने कोणतेही उत्तर दिले नाही. आता हे खत खराब झाले असून त्याची भरपाई रेल्वेने द्यावी अशी मागणी गुप्ता यांनी केली आहे.

टॅग्स :railwayरेल्वे