शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

मेल-एक्स्प्रेसमधून हटवण्यात येणार स्लिपर कोच, रेल्वेने आखला प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2020 20:12 IST

Indian Railway News : लांब पल्ल्याच्या मेल, एक्स्प्रेस गाड्यांमधील डब्यांच्या रचनेमध्ये बदल करण्याचा विचार रेल्वेकडून सुरू आहे. रेल्वेच्या या धोरणानुसार लांब पल्ल्याच्या मेल, एक्स्प्रेस गाड्यांमधून स्लिपर कोच पूर्णपणे हटवण्यात येणार आहेत. याचाच अर्थ अशा गाड्यांमध्ये केवळ एसी बोगी असतील.

ठळक मुद्देमेल, एक्स्प्रेस ट्रेनमधील १३० किमी प्रति तास किंवा त्यापेक्षा अधिक वेगाने चालणाऱ्या नॉन एसी कोसमध्ये तांत्रिक समस्या निर्माण होतातत्यामुळे अशा प्रकारच्या सर्व ट्रेनमधील स्लिपर कोच हटवण्यात येणार दिलासादायक बाब म्हणजे या मेल, एक्स्प्रेससाठीचे भाडेही सामान्य एसी कोचच्या तुलनेत कमी ठेवण्याचा विचार आहे

नवी दिल्ली - भारतीय रेल्वेकडूनरेल्वे नेटवर्कला अपग्रेड करण्याच्या योजनेवर काम सुरू आहे. सुवर्ण चतुष्कोन योजनेंतर्गत लांब पल्ल्याच्या मेल, एक्स्प्रेस गाड्यांमधील डब्यांच्या रचनेमध्ये बदल करण्याचा विचार रेल्वेकडून सुरू आहे. रेल्वेच्या या धोरणानुसार लांब पल्ल्याच्या मेल, एक्स्प्रेस गाड्यांमधून स्लिपर कोच पूर्णपणे हटवण्यात येणार आहेत. याचाच अर्थ अशा गाड्यांमध्ये केवळ एसी बोगी असतील. अशा प्रकारच्या गाड्यांचा वेग १३० ते १६० किमी प्रतितास राहील. मेल, एक्स्प्रेस ट्रेनमधील १३० किमी प्रति तास किंवा त्यापेक्षा अधिक वेगाने चालणाऱ्या नॉन एसी कोसमध्ये तांत्रिक समस्या निर्माण होतात. त्यामुळे अशा प्रकारच्या सर्व ट्रेनमधील स्लिपर कोच हटवण्यात येणार आहेत.लांब पल्ल्याच्या मेल, एक्स्प्रेस गाड्यांमध्ये सघ्या ८३ एसी कोच लावण्याचा प्रस्ताव आहे. मात्र या वर्षाच्या अखेरीस अशा कोचची संख्या वाढवून १०० करण्यात येईल. मात्र पुढील वर्षी कोचची संख्या वाढवून २०० पर्यंत नेण्याची योजना आहे. म्हणजेच पुढील काळात प्रवास अधिकाधिक आरामदायक आणि कमी वेळात पूर्ण होणार आहे. दिलासादायक बाब म्हणजे या मेल, एक्स्प्रेससाठीचे भाडेही सामान्य एसी कोचच्या तुलनेत कमी ठेवण्याचा विचार आहे.मात्र स्लिपर कोच हटवण्यात येणार याचा अर्थ नॉन एसी कोच पूर्णपणे हटवले जातील, असे नाही. मात्र नॉन एसी कोच असलेल्या ट्रेनचा वेग हा एसी ट्रेनपेक्षा कमी असेल. मिळालेल्या माहितीनुसार अशा ट्रेन ११० किमी प्रतितास वेगाने चालवल्या जातील. हे संपूर्ण काम क्रमवार पद्धतीने केले जाईल. तसेच नव्या अनुभवातून शिकून पुढील योजना आखली जाईल.

यापूर्वी भारतीय रेल्वेने बुधवारी ३९ नव्या पॅसेंजर ट्रेन चालवण्यास परवानगी दिली आहे. या सर्व ट्रेन स्पेशल ट्रेनच्या रूपात चालवण्यात येणार आहेत. रेल्वेकडून या सर्व ३९ ट्रेनची यादी जाहीर झाली आहे. मात्र या ट्रेन कधीपासून चालवण्यात येणार याची माहिती देण्यात आलेली नाही.

 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासी