शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Indian Railway: रेल्वे प्रवाशांना ‘युजर चार्जेस’ द्यावे लागणार; सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 08:55 IST

Railway: लवकरच नोटिफिकेशन, सीएसटीएम, कल्याण, ठाणे, स्टेशनचाही समावेश

प्रसाद कानडेपुणे : रेल्वे स्थानकांवरून प्रवास सुरू करणे अथवा संपविणे आता प्रवाशांना महागात पडणार आहे. कारण रेल्वे स्थानकांचा विकास करण्यासाठी युजर चार्जेस लागू केले जाणार आहे. आयआरएसडीसी व आरएलडीए यांनी याबाबत तयार केलेल्या प्रस्तावास रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली होती. त्यावर अंतिम निर्णय घेण्यासाठी केंद्रीय कॅबिनेट समोर हा विषय ठेवला होता. मात्र, कॅबिनेटने आमच्या परवानगीची गरज नसल्याचे सांगितले. त्यानुसार आता आयआरएसडीसीने लवकरच नोटिफिकेशन निघणार आहे.

नोटिफिकेशन निघाल्यानंतर तत्काळ पुणेसह देशभरतील प्रमुख स्थानकांवर युजर चार्जेस लागू होतील. हे चार्जेस प्रवाशांच्या तिकिटात समाविष्ट असतील. विमानतळच्या धर्तीवर पुणेसह देशांतील महत्त्वाच्या स्थानकाचा विकास केला जाणार आहे. स्थानकाच्या विकासासाठी आयआरएसडीसी (इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलोपमेंट कॉर्पोरेशन) व आरएलडीए (रेल्वे लँड डेव्हलपमेंट ॲथॉरिटी) ही संस्था काम करते.

किती असणार चार्जेस?  प्रवाशांना युजर चार्जेसच्या नावाखाली १० ते ४० रुपये अतिरिक्त द्यावे लागतील. तिकीट श्रेणीनुसार हे चार्जेस असतील. व्हिजिटर फी देखील असणार आहे. प्रवाशांना सोडण्यासाठी फलाटावर येणाऱ्या व्यक्तींना केवळ फ्लॅटफॉर्म तिकीट काढणे अनिवार्य होते. आता मात्र त्यांना फलाटवर येण्यासाठी व्हिजिटर फीदेखील द्यावी लागणार आहे. ती फी १० रुपये असण्याची शक्यता आहे. रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी युजर चार्जेस आकारले जातील. याचे लवकरच नोटिफिकेशन निघेल. - एस. के. लोहिया, मुख्य कार्यकारी अधिकारी, आयआरएसडीसी, नवी दिल्लीया स्थानकांचा समावेश आयआरएसडीसी महाराष्ट्रातील पुणे, सीएसटीएम, कल्याण, ठाणे, ठाकुर्ली, एलटीटी आदी स्थानकांचा विकास करणार आहे. 

टॅग्स :railwayरेल्वे