Indian Railway Viral Video: रेल्वेतील पॅन्ट्री कर्मचारी तरुणाला खाली उतर म्हणतो. तरुण नकार देतो. त्यानंतर कर्मचारी त्यांच्या अंगावरचे पांघरून ओढतो. तरुण विरोध करतो. कर्मचारी वर चढून त्याला मारहाण करतो. यु ट्यूबरच्या अंगावरचे कपडेही फाडतो. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, लोक संताप व्यक्त करत आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रेल्वे गाडीतील पॅन्ट्री कर्मचाऱ्यांनी ज्याला मारहाण केली, त्या यु ट्यूबरचे नाव विशाल शर्मा आहे. विशाल हेमकुंट एक्स्प्रेसने प्रवास करत होता. त्यावेळी त्याने महागड्या दराने आणि बनावट पदार्थ पाणी विकल्याबद्दल तक्रार केली.
विशालने रेल्वेतील प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा केला उपस्थित
विशालने रेल्वेत घडलेल्या प्रकाराचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्याने म्हटले आहे की, रेल्वेच्या एसी ३ कोचमध्ये अशा प्रकारे प्रवाशांची सुरक्षा आहे. रेल्वेतील पॅन्ट्रीकडून जास्त पैसे घेतले जात असल्याची तक्रार केल्यानंतर त्यांनी माझ्यावर प्राणघातक हल्ला केला. त्याने रेल्वे एक्स्प्रेसचा क्रमांक आणि त्याचा पीआरएन नंबरही पोस्ट केला आहे.
वाचा >>वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह
व्हिडीओमध्ये काय?
विशालने पॅन्ट्री कर्मचाऱ्याला पाण्याची बॉटल मागितली. कर्मचारी म्हणतो की, हीच मिळाली. त्यानंतर विशाल त्याला १५ रुपये देतो. कर्मचारी पुटपुटतो आणि निघून जातो. त्यानंतर तो पाण्याची बॉटल दाखवतो आणि म्हणतो की, हे पाणी शरीरासाठी चांगले नाहीये, पण तहानलेल्या प्रवाशांना हे पिण्याशिवाय पर्याय नाही. आणि ही बॉटल २० रुपयांना विकत आहेत.
पॅन्ट्री कर्मचाऱ्याकडून मारहाण त्यानंतर एक हिरवा रंगाचा टी शर्ट घातलेला कर्मचारी येतो. तो विशालला बोलतो की खाली ये. त्यानंतर दुसरा कर्मचारी त्याचा पाय ओढतो. पाण्याची बॉटल घेऊन आणखी एक कर्मचारी येतो आणि त्याला खाली उतर म्हणतो. एक कर्मचारी पुढे येतो आणि त्याचा कॅमेरा हिसकावण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर तो वर चढतो आणि त्याला मारायला लागतो. त्याला इतकं मारतात की, यात त्याचे कपडेही फाटतात.
रेल्वेत प्रवाशाला मारहाण, व्हिडीओ पहा
हा व्हिडीओ एक्स वर पोस्ट करत त्याने रेल्वेकडे याची तक्रार केली आहे. रेल्वेने या प्रकरणाची दखल घेण्याचे निर्देश रेल्वे पोलिसांना दिले. प्रवाशासोबत बोलून माहिती घ्यावी आणि तात्काळ योग्य कारवाई करावी असे निर्देश रेल्वे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत.