शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेने बनवली इंजिनाविना धावणारी ट्रेन, गाठणार ताशी 200 किमी वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 18:11 IST

भारतीय रेल्वेनेही आता आधुनिकीकरणाच्या दिशेने पावले उचलण्यास सुरुवात केली असून, रेल्वेच्या तामिळनाडूमधील कारखान्यात इंजिनाविना धावणारी ट्रेन तयार करण्यात आली आहे.

नवी दिल्ली - भारतीय रेल्वेमध्ये ट्रेन चालवण्यासाठी डिझेल किंवा इलेक्ट्रिक इंजिनांचा वापर केला जातो. पण भारतीय रेल्वेनेही आता आधुनिकीकरणाच्या दिशेने पावले उचलण्यास सुरुवात केली असून, रेल्वेच्या तामिळनाडूमधील कारखान्यात इंजिनाविना धावणारी ट्रेन तयार करण्यात आली आहे. प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असणारी ही ट्रेन ताशी 160 ते 200 किमी वेग गाठू शकते.ट्रेन-18 असे या ट्रेनचे नामकरण करण्यात आले आहे. ही ट्रेन संपूर्णपणे संगणकीकृत असून, ती बुलेट ट्रेनच्या धर्तीवर विकसित करण्यात आली आहे. ही ट्रेन बनवण्यासाठी सुमारे 100 कोटी रुपये खर्च आला असून,  तिच्या बांधणीसाठी दीड वर्षाचा कालावधी लागला. या ट्रेनमध्ये 16 एसी आणि दोन एक्झिक्युटिव्ह क्लासचे डबे असतील, अशी माहिती या ट्रेनची बांधणी करणाऱ्या इंटिग्रल कोच फॅक्टरीचे महाव्यवस्थापक सुधांशू मणी यांनी दिली. या ट्रेनमध्ये दिव्यांग प्रवाशांसाठी विशेष असे दोन बाथरूम आणि बेबी केअरसाठी विशेष स्थान देण्यात आलेआहे. तसेच ट्रेनच्या कोचमध्ये खास स्पेनमधून मागवण्यात आलेल्या सीट बसवण्यात आल्या आहे. या सीटचे वैशिष्ट्य म्हणजे या सीट पूर्ण 360 अंशांमध्ये वळू शकतात. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही ट्रेन सुमारे 160 ते 220 किमी वेगाने धावू शकते. आणीबाणीच्या परिस्थितीत ट्रेनच्या ड्रायव्हरशी संवाद साधता यावा यासाठी टॉक बॅक सुविधाही देण्यात आली आहे. अशी ट्रेन परदेशातून आयात केली असती तर सुमारे 170 कोटी रुपये खर्च आला असता. मात्र स्वदेशात या ट्रेनची बांधणी करण्यासाठी 100 कोटी रुपये खर्च झाले. स्वदेशी बांधणीची ही हायस्पीड ट्रेन आता धावण्यासाठी सज्ज झाली असून, मुरादाबाद-बरेली आणि कोटा-सवाई माधोपूर या रेल्वे मार्गांवर या ट्रेनची चाचणी होणार आहे. त्यानंतर देशातील प्रमुख रेल्वे मार्गांवर ही ट्रेन धावणार आहे.  

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेBullet Trainबुलेट ट्रेन