भारतीय अभिमानाने तिरंगा फडकावतील - विजय गोयल

By Admin | Updated: July 6, 2016 18:09 IST2016-07-06T18:09:26+5:302016-07-06T18:09:26+5:30

आगामी रिओ आॅलिम्पिक स्पर्धेसाठी जाणारा आतापर्यंतचा सर्वात मोठा भारतीय संघ सुमारे १२५ करोड भारतीयांच्या शुभेच्छांच्या जोरावर नक्कीच अभिमानाने तिरंगा फडकावेल

Indian pride will throw a tricolor - Vijay Goyal | भारतीय अभिमानाने तिरंगा फडकावतील - विजय गोयल

भारतीय अभिमानाने तिरंगा फडकावतील - विजय गोयल

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ६ : आगामी रिओ आॅलिम्पिक स्पर्धेसाठी जाणारा आतापर्यंतचा सर्वात मोठा भारतीय संघ सुमारे १२५ करोड भारतीयांच्या शुभेच्छांच्या जोरावर नक्कीच अभिमानाने तिरंगा फडकावेल, असा विश्वास नवनियुक्त केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी व्यक्त केला.
आपल्या पदाचा कारभार स्वीकारल्यानंतर गोयल म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रीडा मंत्रालयाची जबाबदारी माझ्यावर सोपविली ही माझ्यासाठी अत्यंत सन्मानाची व गर्वाची बाब आहे. देशवासीय, खेळाडू आणि विशेष करुन युवांच्या सहकार्याने आम्ही क्रीडा क्षेत्रात क्रांती करुन देशामध्ये क्रीडा क्षेत्राला नव्या उंचीवर नेऊ.

रिओ आॅलिम्पिकमधील भारतीयांच्या कामगिरीबाबत विचारले असता गोयल म्हणाले की, आॅलिम्पिक जवळपास एक महिन्यावर आले असताना क्रीडामंत्रीपदाची जबाबदारी माझ्याकडे सोपविण्यात आली आहे. भारतीय दलातील सर्वच खेळाडू पदक जिंकण्यास सक्षम असून यंदाचा आपला संघ आतापर्यंत सर्वात मोठा आहे. तब्बल १२५ करोड देशवासीयांच्या शुभेच्छा या खेळाडूंसोबत आहेत. नक्कीच या जोरावर आपले खेळाडू आॅलिम्पिकमध्ये अभिमानास्पद कामगिरी करतील.

Web Title: Indian pride will throw a tricolor - Vijay Goyal