शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

अभिनंदन यांच्याकडून पाकने स्वत:चे करून घेतले कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2019 05:53 IST

विंग कमांडर अभिनंदन यांना भारताकडे सोपवण्याची वेळ पाकिस्तानने दोनदा पुढे ढकलली, कारण पाक अधिकाऱ्यांना त्यांच्या जबानीचा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा होता, असे उघड झाले आहे.

नवी दिल्ली : विंग कमांडर अभिनंदन यांना भारताकडे सोपवण्याची वेळ पाकिस्तानने दोनदा पुढे ढकलली, कारण पाक अधिकाऱ्यांना त्यांच्या जबानीचा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा होता, असे उघड झाले आहे. आपली बाजू आंतराष्ट्रीय समुदायासमोर मांडता यावी, यासाठी पाककडून हे चित्रिकरण करण्यात आले.त्यांना ताब्यात देण्याआधी पाकने घाणेरडे राजकारण केले केले. भारतीय प्रसारमाध्यमे कशा अफवा पसरवतात यावर त्यांना भाष्य करायला लावले. पाकिस्तानने १ मिनिट २४ सेकंदांचा हा व्हिडिओ सुटकेआधी स्थानिक प्रसार माध्यमांना दिला. एवढ्या लहान व्हिडीओमध्ये १७ कट्स केले आहेत.अभिनंदन यांना तीन दिवसांतील घटनाक्रम सांगण्यास भाग पाडले. पाक हवाई हद्दीमध्ये मी लक्ष्य शोधण्याचा प्रयत्नात आलो असताना, पाकच्या विमानांनी माझे विमान पाडताच मी पॅराशूटद्वारे खाली उडी मारली. तिथे खूप लोक जमले होते. त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी मी पिस्तूल टाकून पळू लागलो. तेव्हा दोन पाकिस्तानी जवानांनी मला वाचवले. त्यात पाकिस्तानी लष्कराचे एक कॅप्टनही होते. त्यांनी मला लष्कराच्या युनिटमध्ये नेऊन प्रथमोपचार केले. त्यानंतर रुग्णालयात उपचारांसाठी नेले, असे अभिनंदन म्हणाल्याचे त्या व्हिडीओमध्ये दिसते.पाकिस्तानी लष्कर व्यावसायिक असून, त्यांच्यासह माझा वेळ चांगला गेला. भारतीय प्रसारमाध्यमे छोट्या बाबी निष्कारण वाढवून सांगतात व लोकांना भडकावतात, असे त्यांच्याकडून वदवून घेण्यात आल्याचे या व्हिडीओमधून दिसते. ते कागदावर लिहिलेला मजकूर वाचून दाखवत असल्याचे जाणवते. त्यांच्याकडून काय वदवून घ्यायचे, हे पाकने ठरवले होते. पाकचे गुणगान व भारतीय प्रसारमाध्यमांवरील टीका हे लिहून दिले होते व ते वाचायला लावले, असे व्हिडीओ पाहताना जाणवते. पाकिस्तानने अभिनंदन वर्धमान यांचे लगेच बोगस खोटे ट्विटर अकाऊंटही उघडले आणि त्यांची काही वक्तव्ये त्यावर पोस्ट केली. हे अकाऊंट त्यांना पाकिस्तानने ताब्यात घेतल्यानंतर २८ फेब्रुवारी रोजी उघडण्यात आले आहे. त्यासाठी पाकिस्तानी लष्कराच्या वायफायचा उपयोग करण्यात आला.

टॅग्स :Abhinandan Varthamanअभिनंदन वर्धमानindian air forceभारतीय हवाई दलPakistanपाकिस्तान