शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

"मणिपूरमधील लढाई थांबवा, माझ्या घराला वाचवा", मीराबाई चानूची PM मोदींना भावनिक साद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 12:19 IST

Mirabai Chanu Appeals to PM Modi : मीराबाई चानू हिने पंतप्रधान नरेंद्र मोदींसह गृहमंत्री अमित शहा यांना भावनिक साद घातली आहे. 

mirabai chanu manipur violence : मागील जवळपास दोन महिन्यांपासून मणिपूर हिंसाचाराच्या आगीने होरपळत आहे. राज्यातील हिंसाचार रोखण्यात अयशस्वी ठरलेले मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह राज्यपालांची भेट घेऊन पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा देखील मागील काही काळात सुरू होती. मात्र, नंतर त्या चर्चांना पूर्णविराम देत आंदोलक महिलांनी नाट्यमय घडामोडींना आमंत्रण देत राजीनामा फाडला. पण, आजतागायत मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित झाली नाही. त्यामुळे व्यथित होऊन ऑलिम्पिकमध्ये देशासाठी पदक जिंकणारी मिराबाई चानू हिने पंतप्रधाननरेंद्र मोदींसह गृहमंत्री अमित शहा यांना भावनिक साद घातली आहे.  वेटलिफ्टर मीराबाई चानूने एक व्हिडीओ शेअर करत मणिपूरमधील हिंसाचार रोखण्याचे आवाहन केले आहे. "मणिपूरमधील जातीय संघर्षामुळे अनेक खेळाडू प्रशिक्षण शिबिरांमध्ये सहभागी होऊ शकले नाहीत आणि मुलांच्या शिक्षणावरही याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. मोठ्या संख्येने लोकांना जीव गमवावा लागला. अनेकांची घरे जाळली, मणिपूरमध्ये माझे देखील घर आहे. आता मी राज्यात नाही, मी आता अमेरिकेत असून जागतिक चॅम्पियनशिप आणि आशियाई गेम्ससाठी तयारी करत आहे. मी मणिपूरमध्ये नसले तरी हा संघर्ष कधी संपेल असा प्रश्न मला नेहमी पडतो", असे मीराबाई चानूने म्हटले आहे. 

मीराबाई चानूची PM मोदींना भावनिक सादव्हिडीओ शेअर करताना मीराबाई चानूने पंतप्रधाननरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना टॅग केले आहे. सरकारला आवाहन करताना तिने म्हटले, "मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना आवाहन करते की, त्यांनी आमच्या मणिपूर राज्याला वाचवावे."

दरम्यान, मणिपूरमध्ये अनुसूचित जमाती (एसटी) दर्जा मिळावा यासाठी मैतेई समुदायाच्या मागणीला विरोध करण्यासाठी ३ मे रोजी पहाडी जिल्ह्यांमध्ये 'आदिवासी एकता मार्च' आयोजित केल्यानंतर हिंसाचार सुरु झाला होता. राज्याच्या लोकसंख्येपैकी ५३ टक्के असलेला मैतेई समुदाय प्रामुख्याने इंफाळ खोऱ्यात राहतो. तर नागा आणि कुकी सारख्या आदिवासी समुदायांची लोकसंख्या ४० टक्के आहे आणि ते प्रामुख्याने डोंगराळ जिल्ह्यांमध्ये राहतात. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारMirabai Chanuमीराबाई चानूNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहprime ministerपंतप्रधान