शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
2
मिचेल स्टार्कचा 'Spark'! ट्रॅव्हिस हेडचा भन्नाट चेंडूवर उडवला त्रिफळा, Video 
3
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
4
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
5
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
6
निकालानंतर उद्धव ठाकरे पुन्हा भाजपासोबत जातील?; शरद पवारांचं मोठं विधान
7
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
8
फडणवीस अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात धडकले; अपघात प्रकरणी कारवाईचा धडाका?
9
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
10
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
11
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
12
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
13
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
14
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
15
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
16
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
17
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
18
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध
19
Gold Price Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सोन्याचे दर पुन्हा घसरले
20
PM मोदींच्या वक्तव्यानंतर सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी, कोल इंडियाबाबत ब्रोकरेज बुलिश, म्हणाले...

भारतीय तेलवाहू जहाज बेपत्ता, सागरी चाच्यांनी अपहरण केल्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 5:12 AM

पनामामध्ये नोंदणी केलेले व मुंबईतील अँग्लो इंडियन शिपिंग कंपनीच्या मालकीचे ‘एमटी मरिन एक्स्प्रेस’ हे तेलवाहू जहाज पश्चिम आफ्रिकेच्या किना-यालगतच्या गिनीच्या आखातातून गेले तीन दिवस बेपत्ता झाले.

नवी दिल्ली/मुंबई : पनामामध्ये नोंदणी केलेले व मुंबईतील अँग्लो इंडियन शिपिंग कंपनीच्या मालकीचे ‘एमटी मरिन एक्स्प्रेस’ हे तेलवाहू जहाज पश्चिम आफ्रिकेच्या किना-यालगतच्या गिनीच्या आखातातून गेले तीन दिवस बेपत्ता झाले असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे.या जहाजावर १३,५०० टन गॅसोलिन होते व त्यावर २२ भारतीय कर्मचारी होते. पश्चिम आफ्रिकेतील बेनिन देशातील कॉटॉनू बंदरात नांगर टाकून उभे असताना या जहाजाशी गुरुवारी शेवटचा संपर्क झाला होता. त्यानंतर हे जहाज बेपत्ता झाले. जहाजाच्या कंपनीने घटनेची माहिती नौकानयन महासंचालनालयास दिली व मदतीची विनंती केली.जहाजावरील कर्मचाºयांचा शोध घेणे व त्यांची सुखरूप सुटका करणे हे आमचे सर्वात अग्रक्रमाचे काम आहे. कर्मचाºयांच्या कुटुंबियांना त्यांच्या ख्यालीखुशालीची ताजी माहिती देण्यात येत आहे. पण जहाजाचा शोध अद्याप लागलेला नाही, असे कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले.>सर्व २२ कर्मचारी भारतीय आहेत. पण ते नेमके कुठले आहेत, याची माहिती समजू शकली नाही. दोन कर्मचारी केरळचे असल्याचे समजते. भारताच्या अबुजा येथील वकिलातीसही शोध आणि मदत कार्यावर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे, असे परराष्ट्र प्रवक्ते रवीश कुमार यांनी कळविले.>नौकानयन संचालनालयाने परराष्ट्र मंत्रालयास कळविल्यावर त्यांनी जहाज जेथे संपर्कात होते, त्याच्या जवळच्या नायजेरिया व बेनिन या दोन्ही देशांमधील संबंधित यंत्रणांशी संपर्क साधून त्यांना जहाजाचा शोध घेण्याची विनंती केली.>‘त्या’ सागरी मार्गावरील जहाजांना सावधानतेचा इशाराकदाचित या जहाजाचे चाच्यांनी अपहरण केल्याची शक्यताही वर्तविली जात आहे. गेल्या महिनाभरात अन्य दोन जहाजांचे चाच्यांनी अपहरण केले होते. त्या सागरी मार्गावरील सर्व जहाजांना सावध करण्यात आले असून, या बेपत्ता जहाजाचा सुगावा लागला तर त्यांनी ती माहिती लंडन येथील आंतरराष्ट्रीय सागरी चाचेगिरीविरोधी यंत्रणेच्या मुख्यालयास कळवावे, असा संदेश नायजेरियाने पाठविला आहे.