शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

Rajnath Singh : पाकिस्तानात कसं चुकून पडलं भारताचं मिसाईल? राजनाथ सिंहांनी राज्य सभेत दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 15:26 IST

"भारताची संरक्षण संदर्भातील प्रक्रिया आणि मानके अत्यंत उच्च दर्जाची आहेत. तसेच, सशस्त्र दल अत्यंत चांगले आणि पूर्णपणे प्रशिक्षित तसेच शिस्तबद्ध आहे."

नवी दिल्ली - भारताची क्षेपणास्त्र यंत्रणा अत्यंत सुरक्षित आहे. देशाची संरक्षण संस्था सुरक्षित प्रक्रियेला आणि मानकांना सर्वोच्च प्राधान्य देते. नुकतेच भारतीय क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या हद्दीत पडल्याची जी घटना घडली, ती चुकून घडली होती. यासंदर्भात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी मंगळवारी राज्यसभेत माहिती दिली. तसेच, या घटनेसंदर्भात खेद व्यक्त करत, प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. (Defense Minister Rajnath Singh)

सशस्त्र दल शिस्तबद्ध - संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, "भारताची संरक्षण संदर्भातील प्रक्रिया आणि मानके अत्यंत उच्च दर्जाची आहेत. तसेच, सशस्त्र दल अत्यंत चांगले आणि पूर्णपणे प्रशिक्षित तसेच शिस्तबद्ध आहे. त्यामुळे, दुर्घटनेने मिसाईल फायर होण्याच्या घटनेच्या चौकशीत काही कमी आढळून आल्यास, ती दूर करण्यास भारत वचनबद्ध आहे. देशाची मिसाइल प्रणाली अत्यंत सुरक्षित आहे.'

पाकिस्तानात पडलं होतं भारताचं मिसाईल - भारताचे क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या हद्दीत पडल्यानंतर, पाकिस्तानच्या लष्कराने दावा केला होता की, भारताच्या या क्षेपणास्त्राने सिरसा येथून उड्डाण घेतल्याचे आम्हाला कळले होते आणि काही वेळातच त्याने आपली दिशा बदलली आणि ते पाकिस्तानच्या दिशेने वळाले. हे क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या मियां चन्नू भागात पडले. तसेच, पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिस पब्लिक रिलेशन्सचे महासंचालक मेजर जनरल बाबर इफ्तिखार यांनी पत्रकार परिषद घेत म्हटले होते की, या क्षेपणास्त्राने पाकिस्तानच्या हवाई हद्दीचे उल्लंघन केले आहे. मात्र, पाकिस्तानच्या लष्कराने हे क्षेपणास्त्र पाडण्याचा प्रयत्न केला नाही आणि ते पाकिस्तानी हद्दीत कोसळले.

संयुक्त चौकशीची मागणी -भारत सरकारने याची गांभीर्याने दखल घेतली असून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. यानंतर, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने, क्षेपणास्त्र दुर्घटनेसंदर्भातील भारताच्या प्रतिसादावर आपण समाधानी नाही. क्षेपणास्त्र पाकिस्तानात पडल्याने, भारताची अंतर्गत तपासणी पुरेशी नाही, असे म्हटले होते. याच बरोबर या घटनेची निष्पक्ष चौकशी व्हावी, यासाठी संयुक्त तपासाची मागणीही पाकिस्तानने केली होती, पण त्यांची ही मागणी भारताने धडकावली.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहBJPभाजपाPakistanपाकिस्तानIndiaभारतRajya Sabhaराज्यसभा