शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

इंडियन मेडिकल असोसिएशनचे देशभरातील ४ लाख डॉक्टर उद्या सरकारला देणार 'पांढरा इशारा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 21:29 IST

डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्याविरोधात प्रस्तावित असलेला कायदा तातडीने अध्यादेश काढून मंजूर करावा..

ठळक मुद्दे२२ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता भारतातील सर्व डॉक्टर पांढरा एप्रन घालून पांढरी मेणबत्ती लावणार कोरोनाच्या लढ्यात डॉक्टर आपले काम थांबवणार नाहीत, हेही अधोरेखित

पुणे : इंडियन मेडिकल असोसिएशनचे संपूर्ण देशभरातील चार लाख डॉक्टर २२ एप्रिल रोजी शासनाला 'पांढरा इशारा' देऊन निषेध नोंदवणार आहेत. यामध्ये बुधवारी, २२ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता भारतातील सर्व डॉक्टर पांढरा एप्रन घालून पांढरी मेणबत्ती लावणार आहेत. डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्याविरोधात प्रस्तावित असलेला कायदा तातडीने अध्यादेश काढून मंजूर करावा, अशी मागणी या माध्यमातून केली जाणार आहे. सरकारने हा इशारा गांभीर्याने न घेतल्यास २३ एप्रिल रोजी सर्व डॉक्टर काळ्या फिती लावून काम करतील, असे इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे जाहीर करण्यात आले आहे. कोरोनाच्या लढ्यात डॉक्टर आपले काम थांबवणार नाहीत, हेही अधोरेखित करण्यात आले.याबाबत इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्याचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, 'गेली अनेक वर्षे डॉक्टरांवर हल्ले होत आहेत, त्यांना मारहाण होत आहे. डॉकटर मुलींची छेड काढल्याची अनेक प्रकरणेही समोर आली आहेत. रुग्णालयांवर दगडफेक करून नुकसान केले जाते, कर्मचाऱ्यांना मारहाण केली जाते. या सर्व गोष्टींचा निषेध म्हणून 'व्हाइट अलर्ट' दिला जात आहे.''मागील वर्षी कोलकात्यात डॉक्टरांवरील हल्ल्याची घटना घडली, तेव्हा इंडियन मेडिकल असोसिएशनने देशभर बंद पाळला होता. हल्ले रोखणारा कायदा मंजूर केला जाईल, असे आश्वासन केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी दिले होते. डिसेंबर २०१९ मध्ये संसदेत कायदा मंजूर होईल, असेही सांगण्यात आले होते. मात्र, ऐन वेळी तो मागे घेण्यात आला. आता सरकारने अध्यादेश काढून केंद्रीय कायदा म्हणून तो तातडीने मंजूर करावा. विविध राज्यात अशा प्रकारचे कायदे आहेत. मात्र, केंद्रीय कायदा आल्याशिवाय त्याला बळकटी मिळणार नाही.'

'कोरोनाच्या लढ्यामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनचे सदस्य सरकारला मदत करत आहेत. डॉकटरांना सोसायटीमध्ये येऊ न देणे, रहायला परवानगी न देणे अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. मालेगाव, मुरादाबाद अशा ठिकाणी डॉक्टरांवर हल्ले होत आहेत. तामिळनाडूमध्ये घडलेल्या घटनांमध्ये तीन डॉक्टरांना अंत्यविधीसाठी नेण्यात आले, त्यावेळी रुग्णवाहिका अडवून डॉक्टरांच्या मृतदेहांची विटंबना करण्यात आली. रुग्णवाहिकेच्या चालकाला आणि डॉक्टरांच्या नातेवाईकांना मारहाण करण्यात आली. आजवरची प्रत्येक घटना डॉक्टरांनी संयमाने सहन केली आहे. आता सहनशीलतेचा अंत पाहिला जात आहे. कोरोनाच्या लढ्यात डॉक्टरांवर असलेली सामाजिक जबाबदारी मोठी आहे आणि आम्ही रुग्णसेवेसाठी कटिबद्ध आहोत. मात्र, डॉक्टरांच्या मागण्यांचा सरकारने गांभीयार्ने विचार करावा', असेही भोंडवे म्हणाले. 

टॅग्स :Puneपुणेdoctorडॉक्टरGovernmentसरकारcorona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्र