भारतीय युवक बनला इसिसचा आत्मघाती बॉम्ब

By Admin | Updated: April 24, 2015 09:28 IST2015-04-23T23:35:58+5:302015-04-24T09:28:56+5:30

इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी गेल्या वर्षी कल्याणमधून इराकला गेलेल्यांपैकी एक तरूण इसिसमध्ये आत्मघातकी बॉम्ब बनला असावा असा संशय आहे.

Indian man becomes Ishien's suicide bomb | भारतीय युवक बनला इसिसचा आत्मघाती बॉम्ब

भारतीय युवक बनला इसिसचा आत्मघाती बॉम्ब

डिप्पी वांकाणी, मुंबई
इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी गेल्या वर्षी कल्याणमधून इराकला गेलेल्यांपैकी एक तरूण इसिसमध्ये आत्मघातकी बॉम्ब बनला असावा असा संशय आहे. या माणसाची ओळख शोधण्यासाठी इतर सुरक्षा संघटनांचीही मदत घेण्याचा एनआयएचा विचार आहे.
टिष्ट्वटरवरील, मॅग्नेटगॅस १७ या हँडलवर उपलब्ध झालेल्या माहितीवरून हा संशय निर्माण झाला अहे. राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) व आयबी या दोन्ही संघटनांच्या अधिकाऱ्यांचे या हँडलवर बारीक लक्ष आहे. कारण त्यावर २० एप्रिल रोजी अबू तौहीद अल हिंदी नावाने चेहरा झाकलेल्या माणसाचे छायाचित्र पडले होते. या माणसाच्या हातात एके-४७ रायफल होती व त्याने आपण खलिफाच्या भूमीत आहोत असे म्हटले होते. या व्यक्तीची रायफल आकाशाकडे रोखलेल्या स्थितीतील सहा छायाचित्रे टिष्ट्वटर हँडलवर पडलेली होती. एनआयएमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकमतला दिलेल्या माहितीनुसार या छायाचित्राखाली दोन ओळींचा मजकूरही होता. या मजकुरात असे लिहिले होते की, अबू तौहीद अल हिंदी आता खलिफाच्या भूमीत आहे. भारतातून अगदी कमी लोक इसिसमध्ये सहभागी झाले आहेत. आम्ही मरण्यास तयार आहोत. गुप्तचर खात्यातील वरिष्ठ सूत्राने दिलेल्या माहितीनुसार अल हिंदी हे नाव इसिसमध्ये जाणाऱ्या भारतीय तरुणांना देण्यात आले असावे.


 

 

Web Title: Indian man becomes Ishien's suicide bomb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.