गुड न्यूज! "या" उद्योगाला मिळणार नवसंजीवनी; 2021मध्ये 10 लाख लोकांना मिळणार रोजगाराची संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2020 10:39 AM2020-12-19T10:39:59+5:302020-12-19T10:56:08+5:30

Indian Food Services Industry : कोरोना लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून हजारो लोक बेरोजगार झाले आहेत.

indian food services industry can re employ 10 lakh people in 2021 | गुड न्यूज! "या" उद्योगाला मिळणार नवसंजीवनी; 2021मध्ये 10 लाख लोकांना मिळणार रोजगाराची संधी

गुड न्यूज! "या" उद्योगाला मिळणार नवसंजीवनी; 2021मध्ये 10 लाख लोकांना मिळणार रोजगाराची संधी

googlenewsNext

नवी दिल्ली - देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. कोरोना लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून हजारो लोक बेरोजगार झाले आहेत. सर्वच क्षेत्रातील व्यवसायांना कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सुरुवातीच्या काळात हॉटेल्स, रेस्टॉरंट बंद होते. त्यामुळे फूड इंडस्ट्रीला मोठं नुकसान सहन करावं लागलं. मात्र आता नोकरीच्या शोधात असणाऱ्या मंडळींसाठी एक खूशखबर आहे. त्यांच्यासाठी लवकरच रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

इंडियन फूड सर्व्हिसेस इंडस्ट्रीमध्ये नववर्षात 10 लाख नवे रोजगार निर्माण करण्याची शक्यता आहे. रेस्टॉरंट टेबल रिझर्व्हेशन कंपनी 'डाइनआउट'च्या रिपोर्टनुसार, नव्या वर्षात 45 टक्के तरुण वर्ग 'हेल्थ फूड'कडे वळण्याची शक्यता आहे. रिपोर्टमध्ये नमूद केल्यानुसार रेस्टॉरंटचा प्रामुख्याने भर हा गमावलेले ग्राहक परत मिळवण्यावर राहण्याची शक्यता आहे. नव्या वर्षात म्हणजेच 2021मध्ये 90 टक्के रेस्टॉरंट डिजिटल मेन्यूंचा अवलंब करण्याची शक्यता आहे.

'डाइनआउट'चे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित मल्होत्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, "कोरोना संकटामुळे देशातील फूड सर्व्हिसेस इंडस्ट्री मोठ्या संकटातून जात आहे. मात्र सध्या हा उद्योग थोडा सावरत आहे.  पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत 2021 मध्ये नव्याने जवळपास 10 लाख रोजगारनिर्मिती होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेस्टॉरंट इंडस्ट्रीचा चेहरामोहरा कमालीचा बदलला असून, हेल्दी फूडकडे ग्राहकांचा ओढा वाढला आहे. क्लाउड किचनमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, टेकअवे आणि होम डिलिव्हरींचे प्रमाण वाढत आहे."

होम डिलिव्हरीत 30 टक्के वाढ होऊ शकते

'डाइनआउट'च्या रिपोर्टमध्ये नमूद केल्यानुसार 2021 मध्ये ग्राहकांकडून संपर्कविरहित डिलिव्हरी आणि डिजिटल पेमेंटवर भर दिला जाण्याची शक्यता आहे. नव्या वर्षात टेकअवे ऑर्डरमध्ये 15 टक्के तर डिलिव्हरी ऑर्डरमध्ये 30.5 टक्क्यांची वाढ होण्याचा अंदाज आहे. क्लाउड किचनचा बाजारहिस्सा सध्या 13 टक्क्यांवरून 30 टक्क्यांवर जाण्याचीही शक्यता आहे. पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत होम शेफची संख्या चौपटीने वाढण्याची शक्यता असल्याचे देखील रिपोर्टमध्ये म्हटले आहे. 

70 लाखांहून अधिक जणांना दिली होती रोजगाराची संधी 

गेल्या काही महिन्यांत कोरोना लॉकडाऊनमुळे ज्या व्यवसायांची अवस्था बिकट झाली होती. त्यामध्ये रेस्टॉरंटचा देखील समावेश आहे. लॉकडाऊननंतर अनेक नियमांचे पालन करून हा उद्योग कसाबसा उभा राहिला आहे. कोरोनाचे संकट येण्याआधी या क्षेत्राने सत्तर लाखांहून अधिक जणांना रोजगाराची संधी दिली. 'नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया'च्या (एनआरआयए) आकडेवारीनुसार लॉकडाऊनमुळे तीस टक्क्यांहून अधिक रेस्टॉरंट आणि बीअर बार कायमस्वरूपी बंद झाले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 


 

Web Title: indian food services industry can re employ 10 lakh people in 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.