शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 12:03 IST

एक प्रसिद्ध भारतीय राजनैतिक तज्ज्ञ ब्रह्मा चेल्लानी यांनी मोदी सरकारला इस्रायली हल्ल्यापासून धडा घेण्याचा सल्ला दिला आहे...

इस्रायलच्या इराणवरील हल्ल्याची सध्या संपूर्ण जगभरात चर्चा सुरू आहे. या हल्ल्यात इराणचे मोठे नुकसान झाले आहे. इराणचे सर्वात मोठे अण्विक ठिकाण नतांज जवळपास पूर्णपणे नष्ट झाले आहे. याशिवाय, इराणचे अनेक वरिष्ठ अणु वैज्ञानिकही मारले गेले आहेत. या हल्ल्यात इस्रायलने लढाऊ ड्रोन शिवाय लढाऊ विमाने आणि अचूक हल्ला करणाऱ्या मिसाइल्सचाही वापर केला. मात्र, यादरम्यान इराण शत्रूला चोख उत्तर देऊ शकला नाही. यानंतर आता एक प्रसिद्ध भारतीय राजनैतिक तज्ज्ञ ब्रह्मा चेल्लानी यांनी मोदी सरकारला इस्रायली हल्ल्यापासून धडा घेण्याचा सल्ला दिला आहे.

काय म्हणाले ब्रह्मा चेलानी? - ब्रह्मा चेलानी एक्सवर पोस्ट करत म्हणाले, "हवाई युद्धाच्या पहिल्या सिद्धांतानुसार इस्रायलने सुरुवातीच्या हल्ल्यात इराणची हवाई संरक्षण प्रणाली आणि बॅलेस्टिक मिसाइल लॉन्चर नष्ट केले. यामुळे, इराणची प्रत्युत्तर देण्याची क्षमता कमकुवत झाली आणि इस्रायलचा आत खोलवर मारा करण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र, भारताच्या राजकीय नेतृत्वाने या मूलभूत सिद्धांताकडे दुर्लक्ष केले. त्यांनी सुरुवातीला सशस्त्र दलांना केवळ पाकिस्तानातील दहशतवादी छावण्यांवरच हल्ला करण्याचे निर्देश दिले. एक असा दृष्टिकोण ज्यामुळे काही भारतीय लढाऊ विमानांचे नुकसान झाले"

 

ऑपरेशन सिंदूर दरम्यान काय घडलं? - खरे तर, २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, ७ मे रोजी भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले. या काळात भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील किमान ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये भारताचेही नुकसान झाल्याचा दावा अनेक वृत्तांतात करण्यात आला होता. याशिवाय, पाकिस्ताननेही कुठलाही पुरावा न देता अनेक भारतीय लढाऊ विमाने पाडल्याचा दावा केला होता. मात्र, भारताने पाकिस्तानचे सर्व दावे फेटाळून लावले होते. पण काही प्रमाणात नुकसान झाल्याचे मान्यही केले होते.

भारताच्या या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात, पाकिस्तानने शेकडो ड्रोन हल्ले करत भारतीय लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. भारतीय हवाई संरक्षण दलाने पाकिस्तानचे सर्वच्या सर्व हल्ले हाणून पाडले. यानंतर भारताने पाकिस्तानच्या ११ लष्करी तळांवर हल्ले करत ते नष्ट केले. यात नूर खान एअरबेसचाही समावेश होता, यालाच पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचे कमांड सेंटरही म्हटले जाते. याशिवाय, भारताने केरणा हिल्सवरही बॉम्बिंग केली. यात पाकिस्तानच्या गुप्त अण्वस्त्र सुविधेचे मोठे नुकसान झाले. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानIsraelइस्रायलIranइराण