मंदीत काळ्या पैशामुळे तरली भारतीय अर्थव्यवस्था
By Admin | Updated: November 15, 2016 19:11 IST2016-11-15T18:18:18+5:302016-11-15T19:11:46+5:30
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी काळ्या पैशावर खळबळजनक वक्तव्य केलं आहे.

मंदीत काळ्या पैशामुळे तरली भारतीय अर्थव्यवस्था
ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 15 - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी काळ्या पैशावर खळबळजनक वक्तव्य केलं आहे. जागतिक मंदीच्या काळात काळ्या पैशामुळेच भारतीय अर्थव्यवस्थेला मदत मिळाली, असं मत अखिलेश यादव यांनी मांडलं आहे. अखिलेश यादव यांनी मंगळवारी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
काळ्या पैशाला मी थारा देत नाही. मात्र अर्थतज्ज्ञांच्या विश्लेषणानुसार जागतिक मंदीच्या काळात काळा पैशामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा फारसा परिणाम जाणवला नाही, असं मत अखिलेश यादव यांनी व्यक्त केलं आहे. मी काळा पैशाच्या पूर्णतः विरोधात आहे. मला काळा पैसा नको, असंही ते म्हणाले आहेत.
सरकारनं 500 आणि 1000च्या नोटा बंद करण्याचा निर्णय जाहीर केल्यापासून बँकांच्या बाहेर जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या आहेत. तसेच नोटबंदीच्या निर्णयामुळे जनतेलाही प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे. नोटबंदीमुळे काळा पैशावर कोणताही परिणाम होणार नसल्याचंही अखिलेश यादव म्हणाले आहेत.