हिममानवाच्या अस्तित्वाच्या 'पाऊल'खुणा? लष्करानं प्रसिद्ध केलेल्या फोटोंमुळे चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 07:26 AM2019-04-30T07:26:03+5:302019-04-30T07:43:56+5:30

मकालू बेस कॅम्पजवळ आढळले पायांचे मोठे ठसे

Indian Army Sights Mysterious Footprints Of Mythical Beast Yeti Near Makalu Base Camp | हिममानवाच्या अस्तित्वाच्या 'पाऊल'खुणा? लष्करानं प्रसिद्ध केलेल्या फोटोंमुळे चर्चेला उधाण

हिममानवाच्या अस्तित्वाच्या 'पाऊल'खुणा? लष्करानं प्रसिद्ध केलेल्या फोटोंमुळे चर्चेला उधाण

googlenewsNext

नवी दिल्ली : हिममानव प्रत्यक्षात आहे की नाही, याबद्दल अनेकदा चर्चा होते. महाकाय हिममानवाचं वर्णन तुम्ही अनेकदा पुस्तकात वाचलंदेखील असेल. मात्र खरंच हिममानव अस्तित्वात आहे का, हा प्रश्न कायम आहे. अशा परिस्थितीत भारतीय लष्कराला मकालू बेस कॅम्पजवळ पायांचे काही ठसे आढळून आले आहेत. या ठशांचा आकार पाहता, खरंच हिममानव अस्तित्वात आहे का, याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. 

भारतीय लष्करानं पहिल्यांदाच हिममानव 'येती'च्या अस्तित्वाचं काही फोटो प्रसिद्ध केले आहेत. भारतीय लष्कराच्या ट्विटर अकाऊंटवरुन प्रसिद्ध करण्यात आलेल्या या फोटोंमध्ये महाकाय पायांचे ठसे दिसत आहेत. हे ठसे हिममानव 'येती'च्या पायांचे असू शकतात अशी चर्चा सुरू झाली आहे. 'भारतीय लष्कराच्या एका गिर्यारोहक पथकाला पहिल्यांदाच मकालू बेस कॅम्पजवळ जवळपास 32x15 इंचाचे रहस्यमयी हिममानव येतीच्या पायांचे ठसे सापडले आहेत. हा मायावी हिममानव याआधी केवळ मकालू-बरुन नॅशनल पार्कमध्ये दिसला होता,', असं लष्करानं ट्विटमध्ये म्हटलं आहे. 




येती आहे तरी कोण?
जगातील रहस्यमयी प्राणी असलेल्या येतीची कहाणी जवळपास 100 वर्ष जुनी आहे. अनेकदा हा प्राणी दिसल्याचं वृत्त आलं होतं. लडाखमधल्या बौद्ध मठांमध्ये राहणाऱ्या काहींनी हिममानव येती दिसल्याचा दावा केला आहे. मात्र संशोधनकर्त्यांचं मत काहीसं वेगळं आहे. संशोधनकर्ते येतीला हिममानव मानत नाही. येती हा माणूस नसून तो ध्रुवीय आणि तपकिरी रंगाच्या अस्वलाच्या संकरापासून जन्माला आलेला प्राणी असल्याचं संशोधनकर्ते मानतात. 

येती हा महाकाय प्राणी असून त्याचा चेहरा माकडासारखा असतो, असा काही वैज्ञानिकांचा दावा आहे. येतीचा चेहरा माकडासारखा असला, तरी तो माणसाप्रमाणे दोन पायांवर चालतो, असंदेखील वैज्ञानिक सांगतात. येतीचे अनेक रोमांचक किस्से सांगितले जातात. मात्र त्याच्याबद्दल वैज्ञानिकांमध्ये एकमत नाही. 

Web Title: Indian Army Sights Mysterious Footprints Of Mythical Beast Yeti Near Makalu Base Camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.