शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

दुय्यम दर्जाच्या दारुगोळ्यामुळे अपघात वाढले, लष्कराने संरक्षण मंत्रालयाकडे व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 09:31 IST

दुय्यम दर्जाचा दारुगोळा आणि युद्ध सामुग्रीमुळे वाढत असलेल्या अपघातांबाबत लष्कराने चिंता व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली - दुय्यम दर्जाचा दारुगोळा आणि युद्ध सामुग्रीमुळे वाढत असलेल्या अपघातांबाबत लष्कराने चिंता व्यक्त केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा दारुगोळा सरकारी मालकीच्या ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डकडून लष्कराकडील रणगाडे, तोफा एअर डिफेन्स गन आणि अन्य युद्धसामुग्रीसाठी पुरवण्यात येतो. दरम्यान, दुय्यम दर्जाच्या दारुगोळ्यामुळे होत असलेल्या अपघातांमुळे चिंतीत असलेल्या लष्कराने याबाबत संरक्षण मंत्रालयाशी संवाद साधला आहे. अशा दारुगोळ्यामुळे अपघात होऊन जवानांना प्राणास मुकत आहेत किंवा जायबंदी होत आहेत. तसेच युद्धसामुग्रीचेही नुकसान होत आहे, असे लष्कराकडून सांगण्यात आले.  यासंदर्भातील वृत्त हिंदी संकेतस्थळ नवभारत टाइम्सने प्रकाशित केले आहे. या वृत्तात असलेल्या उल्लेखानुसार सरकारी अधिपत्याखालील दारुगोळा कारखान्यांकडून पुरवण्यात येत असलेल्या दारुगोळ्यामुळे वाढत असलेल्या दुर्घटनांमुळे लष्कराचा या सामुग्रीवर असलेला विश्वास कमी झाला आहे. दारुगोळा कारखान्यांकडून दारुगोळ्याच्या दर्जाबाबत अपेक्षित काळजी घेतली जात नसल्याने लष्कराने संरक्षण उत्पादन सचिव अजय कुमार यांच्याकडे गंभीर चिंता व्यक्त केली आहे.  वर्षाकाठी 19 हजार कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या ऑर्डनन्स फॅक्ट्री बोर्डाकडे दारुगोळा बनवणारे एकूण 41 कारखाने आहेत. हे कारखाने 12 लाख जवान सेवेत असलेल्या भारतीय लष्कराला दारुगोळ्याचा पुरवठा करणारे मुख्य स्रोत आहेत. या ऑर्डनन्स फॅक्टरीमधून उप्तादित दारुगोळ्याच्या दर्जात होत असलेल्या घसरणीचा देशाच्या युद्धक्षमतेवर परिणाम होतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान लष्कराकडून याबाबत तक्रार करण्यात आल्यानंतर संरक्षण उत्पादन सचिव कुमार यांनी लष्कराला त्यांच्या विविध समस्या आपल्यासमोर मांडण्यास सांगितले आहे. 

 संरक्षण उत्पादन सचिवांना सादर केलेल्या 15 पानांच्या कागदपत्रांमध्ये लष्कराने अत्यंत गंभीर असे प्रश्न मांडले आहेत. 105 एमएमची इंडियन फिल्ड गन, 105 एमएम लाइट फिल्ड गन, 130 एमएम लाइट फिल्ड गन, 130 एमएम 1 मीडियम गन, 40 एमएम एल-70 एअर डिफेन्स गन,  टी-72, टी-90 आणि अर्जुन टँकच्या तोफांबाबत नियमित अपघात घडत आहेत. याशिवाय 155 एमएमच्या बोफोर्स तोफांबाबतही खराब दारुगोळ्याचे प्रकार घडले आहेत, असे लष्कराने संरक्षण उत्पादन सचिवांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. सुत्रांच्या म्हणण्यानुसार ऑर्डनन्स फॅक्ट्री बोर्डाने ही समस्या सोडवण्यासाठी म्हणावे तेवढे गांभीर्य दाखवलेले नाही. त्यामुळे लष्कराने लांबपल्ल्याच्या दारुगोळ्याची फायरिंग थांबवली आहे.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानDefenceसंरक्षण विभागIndiaभारत