शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लष्कराकडून मोठी कपात; येत्या 5 वर्षात दीड लाख जवानांना सेवेतून कमी करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 10:13 IST

सध्या भारतीय लष्करात 12 लाखांहून अधिक जवान

नवी दिल्ली: भारतीय लष्कर आधुनिकीकरणाच्या दृष्टीनं एक पाऊल पुढे टाकणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुढील 5 वर्षांमध्ये तब्बल दीड लाख जवानांना नारळ दिला जाणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या लष्कराची उभारणी करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून तंत्रज्ञानावर अधिक भर दिला जात आहे. सध्या भारतीय लष्करातील जवानांची संख्या 12 लाखांपेक्षा जास्त आहे. यापैकी दीड लाख ते दोन लाख जवानांना येत्या 5 वर्षांमध्ये सेवेतून कमी केलं जाणार आहे. भारतीय लष्कराची नवी रचना करण्यास पुढील महिन्यापासून सुरुवात होईल. त्यामुळे येत्या दोन वर्षांमध्ये 50 हजार जवानांना नारळ दिला जाईल. 1998 नंतर प्रथमच लष्कराकडून जवानांच्या संख्येत कपात केली जाणार आहे. 1998 मध्ये कारगिल युद्धाच्या आधी लष्करप्रमुख व्ही. पी. मलिक यांनी जवानांच्या संख्येत कपात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी 50 हजार जवानांना सेवेतून कमी करण्यात आलं होतं. आता लष्कराचं आधुनिकीकरण करण्यासाठी लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी जवानांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे लष्करातील अनेक विभाग आता कालसुसंगत राहिलेले नाहीत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे त्यांची उपयोग्यता कमी झाली आहे. लष्कराच्या मुख्यालयातूनच बिपिन रावत जवानांची कपात सुरू करणार आहेत. त्यामुळे मुख्यालयातील लष्करी प्रशिक्षणाची जबाबदारी शिमल्यातील ट्रेनिंग कमांडकडे दिली जाऊ शकते. माहिती युद्ध विभाग आणि जनसंपर्क विभाग यांचं लवकरच एकत्रीकरण केलं जाऊ शकतं. शस्त्रसामग्री निर्मिती विभाग आणि धोरण आखणीची जबाबदारी असणारा विभागदेखील एकत्रित केला जाऊ शकतो. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानDefenceसंरक्षण विभाग