शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Indian Army: लाडकी लेक सैन्य दलात 'मेजर' बनली, माजी मुख्यमंत्र्यांना अत्यानंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 14:47 IST

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त रमेश पोखरियाल यांनी ट्विटरवरुन लाडक्या लेकीसह आपला फोटो शेअर केला आहे.

मुंबई - माणूस कितीही मोठा असला तरी, आपली मुलं हे आपल्यापेक्षा कर्तृत्ववान व्हावीत हीच त्याची इच्छा असते. आपल्या मुलांनी त्यांचे स्वप्न पूर्ण करावेत, त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात स्वत:चं नाव करावं, हे स्वप्न आई-वडिलांचही असतं. मग, ते वडिल राज्याचे माजी मुख्यमंत्री किंवा देशाचे माजी केंद्रीय मंत्री का असेनात. देशाचे माजी केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विटर अकाऊंटवरन आपल्या लेकीचा फोटो शेअर करत अत्यानंद झाल्याचे म्हटले आहे. तसेच, आजचा दिवस माझ्यासाठी गौरव आणि अभिमानाचा असल्याचंही ते म्हणाले.

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त रमेश पोखरियाल यांनी ट्विटरवरुन लाडक्या लेकीसह आपला फोटो शेअर केला आहे. कारण, मुलगी श्रेयशी निशंक हिची भारतीय सैन्य दलात मेजर पदावर पदोन्नती झाल्याने आपणास अत्यानंत झाल्याचे त्यांनी म्हटलं. देवभूमी उत्तराखंड ही वीर मातांची भूमी आहे. येथे साधारण प्रत्येक कुटुंबातील एक व्यक्ती सैन्य दलात भरती असून देशसेवा बजावत आहे. देवभूमीच्या या गौरवशाली परंपरेला आपल्या मुलीने पुढे नेल्याचं निशंक यांनी म्हटलं. माझ्या मुलीसह उत्तराखंडमधील कन्या समाजहित आणि राष्ट्राला पुढे नेण्यासाठी काय एक पाऊल पुढे असल्याचंही रमेश निशंक यांनी यावेळी म्हटलं.  माजी केंद्रीयमंत्री आणि पिता या फोटोमध्ये आपल्या लाडक्या लेकीला जवळ घेऊन तिचा अभिमान व्यक्त करताना दिसत आहेत. तसेच, मेजर पदावर पदोन्नती झाल्यानंतर सैन्याच्या वर्दीवर मेजरचा सिम्बॉल लावताना दिसून येतात. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानUttarakhandउत्तराखंडChief Ministerमुख्यमंत्रीBJPभाजपा