शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय सैन्याचे मोठे यश! लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार, ३ जणांना जीवंत पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 12:33 IST

मध्यरात्री जम्मू आणि काश्मीर पोलीस आणि लष्कराने राबवलेल्या संयुक्त ऑपरेशनमध्ये दहशतवाद्यांना पकडण्यात यश आले आहे.

नवी दिल्ली : मध्यरात्री जम्मू आणि काश्मीर पोलीस आणि लष्कराने राबवलेल्या संयुक्त ऑपरेशनमध्ये तीन दहशतवाद्यांना पकडण्यात यश आले आहे. खराब हवामान आणि मुसळधार पावसाचा फायदा घेत पुंछ सेक्टरमध्ये एलओसीवर घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तीन-चार दहशतवाद्यांना रोखण्यात आले. भारतीय सैन्याची चाहूल लागताच दहशतवाद्यांनी लष्करावर गोळीबार करण्यास सुरूवात केली. प्रत्युत्तरात भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईत काही दहशतवादी मारले गेले.

दरम्यान, परिसराची नाकाबंदी करण्यात आली असून शोध मोहीम सुरू आहे. शोध मोहिमेत घटनास्थळी सर्वत्र रक्ताच्या थारोळ्या आढळून आल्या. तसेच तीन दहशतवाद्यांना काही शस्त्रे, आयईडी आणि नार्कोसह इतर काही वस्तूंसह पकडण्यात आले आहे. लष्कराच्या जवानांनी पूंछच्या नियंत्रण रेषेला लागून असलेल्या खेरी सेक्टरच्या रॉक पोस्टजवळ तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. एक संशयित जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्याकडून शस्त्रे, दारूगोळा आणि ड्रग्जची पाकिटे देखील जप्त करण्यात आली आहेत. एक एके-४७, दोन पिस्तूल, ६ ग्रेनेड, एक आयडी आणि हेरॉइनची २० पाकिटे सापडली आहेत. सुरक्षा दल तिघांचीही कसून चौकशी करत आहेत.

पकडण्यात आलेले तिन्ही संशयित दहशतवादी असल्याचे तपासाअंती उघड झाले. मध्यरात्री झालेल्या अंधाधुंद गोळीबारात भारतीय सैन्याचा एक जवान जखमी झाला आहे. 

 

 

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवानterroristदहशतवादीPoliceपोलिस