शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

भारतीय राजदूतांची चिनी कम्युनिस्ट पक्षाशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 02:58 IST

...तर आर्थिक नुकसान मोठे; ‘ड्रॅगन’ला करून दिली स्पष्ट शब्दांत जाणीव

नवी दिल्ली : ईशान्य लद्दाख सीमेवरून सैन्य माघारीसाठी सुरू असलेली लष्करी चर्चा आतापर्यंत निष्फळ ठरल्याने भारताने चीनवर राजनैतिक दबाव वाढवला आहे. बीजिंगमध्ये भारतीय राजदूत विक्रम मिस्री यांनी चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या परराष्ट्रसंबंध आयोगाच्या केंद्रीय समितीचे उपसंचालक लि जियानचओ यांची भेट घेतली. ६ जून रोजी लष्करी अधिकारी व ५ जुलैला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना चिनी प्रतिनिधींनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करा; अन्यथा संबंधात तणाव कायम राहील, अशी भूमिका भारताने आजच्या बैठकीत घेतली. चीनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून पहिल्यांदा भारतानेच स्वीकारले होते व दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांचे हे ७० वे वर्ष असल्याची आठवणदेखील या बैठकीत मिस्री यांनी करून दिली.पँगाँग सरोवर व फिंगर पॉइंट आठ परिसरातून पूर्ण सैन्य माघारीशिवाय आपले संबंध सुधारणार नाहीत, अशा शब्दांत भारताने चीनला सुनावले आहे. आता परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांसह भारताने कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनाही भविष्यातील परिणामांची जाणीव करून दिली.परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या निरीक्षणानुसार भारताने सर्व आघाड्यांवर चीनची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाचा कहर सुरू असताना सर्वच देशांमध्ये आर्थिक अस्वस्थता आहे. त्यात लद्दाख सीमेवरील हिंसक झटापटीमुळे भारतात चीनविरोधात रोष वाढला आहे. सीमावादाच्या बदल्यात भारतीय बाजारपेठेपासून कायमचे दुरावणे चीनला महागात पडू शकते. आतापर्यंत कमांडर स्तरावर दोन्ही देशांमध्ये सहा वेळा चर्चा झाली आहे. दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्येही चर्चा झाली. सीमावादावर तोडगा काढण्यासाठी चिनी परराष्ट्रमंत्री व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यामध्येही प्रदीर्घ चर्चा झाली होती. भारताने युद्धसज्जता करून चीनची आर्थिक कोंडीदेखील केली. त्यामुळे ड्रॅगन अस्वस्थ आहे.मे महिन्यापासूनच लद्दाख सीमेवर चिनी सैनिकांची गस्त वाढली होती. भारताच्या नजरेतूत ते सुटले नाही.वारंवार सूचना करूनदेखील गलवान खोºयात कायमस्वरूपी तळ बांधण्यासाठी चिनी सैनिकांनी जमवाजमव करताच जवानांनी ते उद्ध्वस्त केले. त्यानंतर झालेल्या हिंसक झटापटीत वीस जवान शहीद झाले. चीनने मात्र अद्याप त्यांच्या मृत सैनिकांचा आकडा प्रसिद्ध केला नाही. तेव्हापासून लष्करी व राजनैतिक चर्चा सुरू आहे.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावchinaचीन