शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

Indian Air Strike on Pakistan: ...अन् पाकिस्तानी नागरिकांनीच केला त्यांच्या सैन्याचा पोपट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2019 18:26 IST

पाकिस्तानी सैन्याचा दावा नागरिकांनीच खोटा ठरवला

इस्लामाबाद: भारतीय हवाई दलानंपाकिस्तानच्या हद्दीत घुसून 300 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. रात्री तीन ते साडेतीनच्या दरम्यान भारतीय हवाई दलानंजैश-ए-मोहम्मदच्या तळांवर हल्ला चढवला. हवाई दलाच्या 12 मिराज 2000 विमानांनी मध्यरात्री नियंत्रण रेषा ओलांडून दहशतवादी तळांवर हल्ले केले. बालाकोट, मुझफ्फराबाद आणि चकोठी भागात हवाई दलानं 1000 किलोंचे बॉम्ब फेकले. भारताच्या या कारवाईनं नाक कापलं गेलं. मात्र पाकिस्तान याला हल्ला मानायला तयार नाही.भारतीय हवाई दलाच्या विमानांनी पाकिस्तानी हद्दीत घुसण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याचा दावा पाकिस्तानी सैन्यानं केला. मात्र पाकिस्तानच्या या दाव्याची त्यांच्याच नागरिकांनी पोलखोल केली. मध्यरात्री तीन वाजता मोठा आवाज ऐकू आला आणि त्यानंतर पाच स्फोटकांचा आवाज झाला, अशी माहिती मोहम्मद आदिल नावाच्या व्यक्तीनं बीबीसीला दिली. काही वेळातच आवाज थांबले, असंदेखील तो म्हणाला.पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी सकाळी ट्विट केलं. भारतानं घुसखोरीचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला. 'भारतीय हवाई दलानं मुझफ्फराबाद सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केला. याला पाकिस्तानी सैन्यानं चोख प्रत्युत्तर दिलं. पाकिस्ताननं त्वरित कारवाई केल्यानं भारतीय विमानांनी लगेच माघार घेतली,' असं गफूर यांनी ट्विटमध्ये म्हटलं. पाकिस्तानातील सत्ताधारी पक्ष तहरिक ए इन्साफनंदेखील हल्ल्याच्या वृत्ताचा इन्कार केला. पाकिस्तानी लष्कर आणि सरकारनं भारतीय विमानं हद्दीत आलीच नाहीत, असा दावा केला. मात्र पाकिस्तानी नागरिकांनी केलेल्या ट्विट्समुळे हा दावा फोल ठरला. 'पहाटे 4 वाजता वाजता लढाऊ विमानं आकाशात घिरट्या घालत आहेत. बालाकोटजवळ स्फोटकांचा आवाज येत आहे. पाकिस्तान झिंदाबाद,' अशी ट्विट्स काहींनी केली. पाकिस्तानच्या विमानांनी रात्री उड्डाणच केलं नव्हतं. याशिवाय पाकिस्ताननं कोणताही स्फोट घडवला नव्हता. त्यामुळे मध्यरात्री पाकिस्तानच्या आकाशात उडणारी विमानं भारताचीच होती, हे स्पष्ट झालं.  

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकindian air forceभारतीय हवाई दलJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मदPakistanपाकिस्तान