शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Indian Air Strike on Pakistan: निर्धास्त झोपा, आम्ही जागे आहोत; पाकिस्तानी सुरक्षा दलाच्या ट्विटनंतर भारताचे हवाई हल्ले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2019 17:20 IST

पाकिस्तानी नागरिकांना गाढ झोपायला सांगणाऱ्या सुरक्षा दलांची झोप भारतीय हवाई दलानं उडवली

नवी दिल्ली: पुलवामातील दहशतवादी हल्ल्याला अकरा दिवस पूर्ण झाल्यानंतर भारतीय हवाई दलानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठी कारवाई केली. या कारवाईनं पुलवामात हल्ला घडवणाऱ्या जैश-ए-मोहम्मदचं कंबरडं मोडलं. भारतीय हवाई दलानं मध्यरात्री तीन ते साडेतीनच्या दरम्यान अवघ्या 21 मिनिटांमध्ये जैशचा अल्फा-3 नियंत्रण कक्ष आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या कारवाईनं पाकिस्तानात भूकंप झाला. भारतीय हवाई दल पाकिस्तानच्या हद्दीत 40 किलोमीटर अंतरापर्यंत आत येऊन बॉम्बफेक करुन गेलं आणि पाकिस्तानला प्रतिहल्लाचीही संधी दिली नाही. यामुळे पाकिस्तानची चांगलीच नाचक्की झाली. पाकिस्तानच्या सुरक्षा दलानं काल रात्री एक ट्विट केलं होतं. तुम्ही निर्धास्त झोपा, पाकिस्तान हवाई दल जागं आहे, असा मजूकर या ट्विटमध्ये होता. रात्री 12 वाजून 6 मिनिटांनी हे ट्विट करण्यात आलं. यानंतर अवघ्या 3 तासांमध्ये भारतीय हवाई दलाची विमानं नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसली आणि त्यांनी बॉम्बफेक केली. विशेष यावेळी पाकिस्तान हवाई दल प्रतिहल्ला करण्याच्या तयारीत होतं. मात्र अवघ्या 21 मिनिटांमध्ये भारतीय वैमानिकांनी लक्ष्याचा अचूक वेध घेतला. यावेळी पाकिस्तानच्या हवाई दलातील F16 विमानं प्रत्युत्तर देतील, असा अंदाज होता. मात्र भारतीय हवाई दलाची ताकद आणि आक्रमक पवित्रा पाहून F16  विमानांनीच धूम ठोकली.कारगिल युद्ध गाजवणाऱ्या मिराज 2000 विमानांनी मध्यरात्री नियंत्रण रेषा ओलांडत धडाकेबाज कारवाई केली. हवाई दलानं बालाकोट, मुजफ्फराबाद आणि चकोठीतील दहशतवादी तळांवर अचूक बॉम्बफेक केली. यावेळी जवळपास 1000 किलोंचे बॉम्ब फेकण्यात आले. भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांनी अतिशय धाडसी मोहीम फत्ते केली. यानंतर सोशल मीडियावर सर्जिकल स्ट्राइक 2 ट्रेंडमध्ये होता. भारत आणि पाकिस्तानातील अनेकांनी ट्विट करुन त्यांच्या भावना व्यक्त केल्या. पाकिस्तानातील काहींनी भारतावर टीका केली. तर काहींनी पाकिस्तान सरकार आणि सुरक्षा दलांना धारेवर धरलं. भारतीय विमानं पाकिस्तानच्या हद्दीत येऊन बॉम्बफेक करुन निघून गेली. त्यावेळी तुम्ही झोपला होतात का?, असा सवाल अनेकांनी उपस्थित केला.  

 

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकPakistanपाकिस्तानJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मदindian air forceभारतीय हवाई दलpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला