शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Indian Air Strike on Pakistan: इंदिरा गांधींनंतर नरेंद्र मोदींनीच पाकिस्तानमध्ये घुसून दाखवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2019 09:41 IST

Indian Air Strike on Pakistan: हवाई दलाच्या १२ विमानांनी ४८ वर्षांनंतर एलओसी ओलांडली

हरिश गुप्ता 

नवी दिल्ली : दहशतवाद्यांना जन्माला घालणारे कारखाने नष्ट करण्यासाठी हवाई दलाला नियंत्रण रेषा ओलांडण्याची परवानगी देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या भारताचे आगमन झाल्याचा संदेश दिला. इंदिरा गांधी यांनी १९७१ मध्ये पूर्ण युद्धाची घोषणा झाल्यावर पाकिस्तानच्या आत हवाई दलाला पाठवले होते. मोदी यांनी ती इच्छाशक्ती ४८ वर्षांनी दाखवत विमानांना एलओसीच्या आत जाण्यास मुभा दिली.

दहशतवादाविरुद्ध यापूर्वी विश्वनाथ प्रताप सिंह, चंद्रशेखर, पी. व्ही. नरसिंह राव, अटल बिहारी वाजपेयी एवढेच काय डॉ. मनमोहनसिंग यांनीही असा उपाय केला नव्हता. १९८९ मध्ये केंद्रीय गृहमंत्री मुफ्ती महंमद सईद यांची मुलगी रुबियाच्या बदल्यात आठ दहशतवाद्यांना सोडण्यात आले. पंतप्रधान चंद्रशेखर यांनी १९९० मध्ये सैफुद्दीन सोझ यांच्या मुलीच्या बदल्यात जेकेएलएफच्या अतिरेक्यांना सोडले. १९९३ मध्ये नरसिंह राव यांनी हजरतबाल मशिदीत ओलिस प्रकरणात अतिरेक्यांना जाऊ दिले होते. १९९९ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांनी इंडियन एअरलाइन्सच्या विमानातील प्रवाशांच्या बदल्यात मसूद अझहर व तिघांना कंदाहारमध्ये नेऊन सोडले. त्याच मसूद अझहरने २00१ मध्ये संसदेवर हल्ला घडवून आणला. डॉ. मनमोहनसिंग यांना मुंबई हल्ल्यानंतर स्ट्राइक करायचा होता. परंतु, प्रत्यक्षात तसे घडले नाही.जोखीम पत्करून कारवाई

उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मोदी यांच्या विरोधकांनी सप्टेंबर २०१६ मध्ये सर्जिकल स्ट्राईक झालाच नाही या केलेल्या टीकेला ताज्या कारवाईमुळे पूर्णविराम दिला गेला आहे. मंगळवारचा हल्ला झाला हे पाकिस्ताननेही मान्य केले आहे.१९८९ पासूनच्या पंतप्रधानांनी जे धाडस केले नाही ते मोदी यांनी करून दाखवले आणि परिणाम काहीही होवो नियंत्रण रेषेच्या आत शिरून हल्ला करण्यास मागेपुढे बघितले जाणार नाही, असा स्पष्ट संदेश पाकिस्तानला त्यांनी दिला आहे. आपण परिणामांची चिंता न करता मोठी जोखीम घेणारे आहोत हे मोदी यांनी दाखवून दिले आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकNarendra Modiनरेंद्र मोदीIndira Gandhiइंदिरा गांधी