'ते' विमान अद्यापही बेपत्ता, लष्कराचा शोध सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2019 08:55 AM2019-06-04T08:55:03+5:302019-06-04T08:55:16+5:30

भारतीय हवाई दलाचे मालवाहतूक विमान सोमवारी अचानक रडारवरून गायब झाले.

Indian Air Force’s missing AN-32 aircraft with 13 people on board is still not located. C-130J and ground patrols of the Army are still carrying out search operations | 'ते' विमान अद्यापही बेपत्ता, लष्कराचा शोध सुरूच

'ते' विमान अद्यापही बेपत्ता, लष्कराचा शोध सुरूच

Next

गुवाहाटी : भारतीय हवाई दलाचे मालवाहतूक विमान सोमवारी अचानक रडारवरून गायब झाले. हे विमान दुपारी 12 वाजून 25 मिनिटांनी जोरहाटहून निघाले होते. पण दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास त्याचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. भारतीय हवाई दलाचे मालवाहतूक विमान सोमवारी दुपारी कोसळल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या विमानामध्ये 8 कर्मचारी व 5 प्रवासी असे 13 जण होते. त्या विमानाचा आणि त्यातील प्रवाशांचा 12 तासांहून अधिक काळ उलटून गेला तरी थांगपत्ता लागलेला नाही. लष्कराचं सर्च ऑपरेशन सुरू असून, त्या बेपत्ता विमानाचा शोध घेतला जात आहे. 

या विमानाचे अवशेष पायुम नावाच्या गावापाशी दिसल्याचे सांगण्यात आले होते. विमान बेपत्ता झाल्याचे समजल्यापासून नवे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सतत हवाई दलाच्या संपर्कात होते. हे विमान आसामहून अरुणाचल प्रदेशकडे निघाले होते. हे रशियन बनावटीचे अँटोनोव एएन-32 जातीचे विमान असून, यापूर्वीही अशा विमानांना अपघात झाले आहेत. या विमानाचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटताच हवाई दलाने विमानाचा शोध सर्वत्र सुरू केला होता. या कामात लष्कराचे जवान व इंडो-तिबेट बॉर्डर फोर्सचे पोलीसही मदत करीत होते. त्यानंतर संध्याकाळी हे विमान कोसळल्याचे स्पष्ट झाले. या विमानातील कर्मचारी व प्रवासी यांची नावे वा माहिती समजू शकलेली नाहीत. चीनच्या सीमेवरून जात असताना विमानाचा संपर्क तुटल्याने हा घातपात तर नाही ना, अशीही शंका व्यक्त केली गेली होती. हे विमान अरुणाचल प्रदेशातील मेचुका येथील लष्करी तळावरील धावपट्टीच्या दिशेने निघाले होते, असे हवाई दलातर्फे सांगण्यात आले.



कोसळलेले पाचवे विमान ?
यापूर्वी याच जातीची आणखी चार विमाने अशीच कोसळली होती. रशियाहून पाठवण्यात आलेले पहिलेच विमान मार्च 1986मध्ये कोसळले होते. ते विमान व त्यातील सातही जणांना पत्ताच लागला नव्हता. चार वर्षांनी केरळच्या पोनमुडी गावापाशी दुसरे विमान कोसळले. जून 2009मध्ये अरुणाचल प्रदेशातच एक विमान कोसळून 13 जण मृत्युमुखी पडले. त्यानंतर या विमानांमध्ये सुधारणा केल्या. तरीही 12 जुलै 2016 रोजी चेन्नईहून पोर्ट ब्लेअरला निघालेले विमान बेपत्ता झाले. त्याचा शोध लागला नाही.

Web Title: Indian Air Force’s missing AN-32 aircraft with 13 people on board is still not located. C-130J and ground patrols of the Army are still carrying out search operations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.